Roof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान

किंमत किती असेल?

Roof Solar Panel Subsidy 2023 पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी 1 किलोवॅट – 46 हजार 820 रू., 1 ते 2 किलोवॅट – 42 हजार 479रू., 2 ते 3 किलोवॅट – 41 हजार 380 रू., 3 ते 10 किलोवॅट 40 हजार 290 आणि 10 ते 100 किलोवॅटसाठी – 37 हजार 020 रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच या दराप्रमाणे 3 किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची किंमत 1 लाख 24 हजार 140 रुपये असेल. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49 हजार 656 रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल आणि संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात 74 हजार 484 रुपयांचा खर्च करावा लागेल.

वीजबिलात दरमहा 550 रुपयांची बचत :

रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे.

खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड :

सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अर्ज कोठे करायचा?

महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजंन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी आणि ऑनलाईन अर्जा विषयीची माहिती तुम्ही महावितरणच्या  www.mahadiscom.in या वेबसाईटवर पाहू शकता.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.