Tractor Anudan Yojana या योजनेची पात्रता व अटी मध्ये शेतकऱ्यांना फक्त एकाच एकाच ट्रॅक्टर चा लाभ घेता येईल.
शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती वर्गामधील असणे आवश्यक त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
या योजनेचा फायदा केवळ एकाच औजारासाठी देण्यात येईल, म्हणजे राज्य शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान फक्त एकाच औजारासाठी देण्यात येईल उदाहरणार्थ ट्रॅक्टर अवजारे व यंत्र इत्यादी.
शेतकऱ्याचे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीकडे जर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर चलित औजारासाठी लाभार्थी व्यक्ती पात्र मानण्यात येईल परंतु त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असेल.
जर एखाद्या लाभार्थी व्यक्तीने औजारासाठी लाभ घेतला असेल परंतु त्याच औजारासाठी किमान 10 वर्षे तरी अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
एखाद्या शेतकऱ्याने या आधी जर एखाद्या कृषी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास त्याला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड
2) 7/12 उतारा 8 अ दाखला
3) अर्जदार अनुसूचित जाती जमाती चा असल्यास जात प्रमाणपत्र
4) अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
5) स्वयंघोषणापत्र
6) राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
7) पूर्व संमती पत्र
8) पासपोर्ट आकाराचे फोटो
9) जो आवजार खरेदी करायचा आहे त्या अवजाराचे कोटेशन.
10) केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला अवजार तपासणी अहवाल इ. कागदपत्र आवश्यक आहेत.
महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी Maha DBT Portal च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे, जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे. ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कृषी अवजारांवर /यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील गोष्टींवर सरकारकडून अनुदान दिले जाते तसेच यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.
ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान:
ट्रॅक्टर
पॉवर टिलर
ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
बैल चलित अवजारे / यंत्र
मनुष्य चलित यंत्र / अवजारे
प्रक्रिया संच
काढणी पश्चात तंत्रज्ञान
फलोत्पादन यंत्र / अवजारे
वैशिष्ट्यपूर्ण यंत्र / अवजारे
स्वयंचलित यंत्रे
ट्रॅक्टर अनुदान योजना फायदे :
ट्रॅक्टर अनुदान योजनेचे फायदे हे शेती विषयक आहेत. शेतीची कामे कमी वेळात जलद गतीने लवकर होण्यासाठी मोठी मदत होईल.
राज्य शासनाकडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% अनुदान दिले जाते.
राज्य शासनाकडून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% टक्के अनुदान दिले जाते.
या योजनेअंतर्गत शेतकरी स्वतःच्या आवडीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकतो.
अनुदान योजनेमुळे शेतकऱ्याला बँकांकडून किंवा संस्थांकडून कमी व्याजदरात कर्जाची सुविधा देखील दिली जाते.
या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
महिला शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राथमिकता दिली जाते.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.