आधार कार्ड वरील खराब झालेला फोटो कसा बदलायचा? | UIDAI Aadhaar Card Updates

UIDAI Aadhaar Card Updates

1.  याकरिता तुम्हाला सर्वात आधी यु ए डी ए आई UADAI ची वेबसाईट uadai.gov.in या वर लॉग इन करावे लागेल आणि आपला आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.

2.  हा फॉर्म भरावा आणि जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जावे.

3.  त्या ठिकाणी गेल्यानंतर आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल Biomatric Details घेणार.

4.  तुम्हाला तुमचा फोटो काढून द्यावा लागेल. म्हणजेच आधार केंद्रावरील कर्मचारी तुमचा फोटो काढतील.

5.  त्यानंतर आधार केंद्रावरील Aadhar Center कर्मचारी तुमच्याकडून 25 रुपये जीएसटी सशुल्क घेऊन तुमचा आधार कार्ड वरील फोटो अपडेट करेल.

6.  त्यानंतर तुम्हाला कर्मचाऱ्याकडून यू आर एन URN ची स्लीप मिळेल.

7.  त्यानंतर तुम्ही UIDAI website वर URN स्लीपचा वापर करून तुमचा फोटो कर्मचाऱ्याकडून बदलला गेला आहे किंवा नाही हे तपासून पाहू शकता.

8.  तुमचे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर नवीन फोटोसह तुम्ही तुमचे अपडेट आधार कार्ड यु आय डी ए आय UIDAI च्या वेबसाईटच्या माध्यमातून डाऊनलोड सुद्धा करू शकता.

अशाप्रकारे मित्रांनो आधार कार्ड फॉर्म डाऊनलोड करून तो भरून आपण आधार केंद्रावर नेऊन दिल्यानंतर तुमचा फोटो (How to Update Aadhar Card Photo)चांगल्या प्रकारे तुमच्या आधार कार्डवर ठेवता येईल.