Weather in Maharashtra | महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Weather in Maharashtra मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात जोरदार वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता… हवामान खात्याने वर्तविली आहे.

महाराष्ट्रमध्ये अचानक तापमानाचा उच्चांक गाठल्यानंतर पुन्हा एकदा आकाशात जोरदार वाऱ्यांसह काळे ढग निर्माण झाले आहेत. त्याचा तडाखा शेतकरी बांधवांना सोसावा लागणार आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर कोकणात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली तसेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्याने विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने जोर धरला होता.  राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

दि. 9 बुधवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर कोकणात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणांच्या तापमानाचा कमाल पारा 33 ते 37 अंशाच्या दरम्यान नोंदला जात आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे.

Read  Gas Subsidy Information in Marathi | पुन्हा गॅस सबसिडी ची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

मंगळवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे 33 अंश सेल्सिअस तर, नीचांकी तापमानाची नोंद मालेगाव येथे 16.4 अंश सेल्सीअस इतकी झाली. धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत वीजा, मेघगर्जनेसह पाऊस पडला असून, बहुतांश ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणापासून चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आणि अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये पावसाची शक्यता आहे.

कोणत्या भागात गारपिटीचा इशारा दिला :

तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील तुरळक भागात पावसाची शक्यता आहे, मात्र गुरुवारपासून विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे. शहर आणि परिसरातही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read  राज्यात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता | Non Seasonal Rain | Weather in Maharashtra

शहरात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तसेच सायंकाळनंतर औंध, बाणेर, सांगवीसह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसभर ऊन सावलीचा खेळ कायम आहे. पुढील चार दिवस शहर आणि परिसरात ही स्थिती अशीच कायम राहणार असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर अंशतः ढगाळ वातावरण आणि त्यामुळे किमान तापमानात होणारी वाढ यामुळे पुणेकरांना उकाडा अधिक जाणवणार आहे.

किमान तापमान हे 20 ते 24 अंशांवर पोचू शकते. बुधवारी दिनांक 9 ला पावसाची शक्यता कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.
मराठवाडा : बीड, परभणी, हिंगोली, नांदेड. विदर्भ : बुलडाणा, अमरावती.

Weather in Maharashtra ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

x