पुढील आठवड्यापासून 5000 कोटींच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार

पुढील आठवड्यापासून पाच हजार कोटींच्या अतिवृष्टी भरपाईचे वाटप सुरू होणार आहे केळी कांदा तूर कापूस या पिकांचे परतीच्या पावसामुळे फार मोठे नुकसान झाले आहे

महाराष्ट्र सरकारने सर्व नुकसानीच्या भरपाईपोटी दहा हजार कोटींची घोषणा केली आणि त्यानुसार जिल्हानिहाय जे नुकसान झालेले आहे त्याचा अंतिम अहवाल मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झालेला आहे राज्यातील 45 लाख हेक्‍टर पिकासाठी 4985 कोटीची भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दिवाळी पूर्वी म्हणजेच 10 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाल्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिलेली आहे.

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ज्यादा पावसामुळे फटका बसलेला आहे त्यामुळेच शरद पवार माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात सुभाष देशमुख यांचे दौरे झाले कोणाच्या काळात राज्याची आर्थिक परिस्थिती विस्कटल्यामुळे राज्यसरकारने सुद्धा मदतीचा सावध पवित्रा घेतलेला दिसून येतो.

Read  Ativrushti Nuksan Bharpai 2023 | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023

विरोधकांच्या आक्रमकता पाहून महाराष्ट्र सरकारने मदतीचा हात पुढे करून मदतीची घोषणा केली राज्य सरकारने तात्काळ शेती नुकसानीचे पंचनामे मागवले आता तालुक्यानुसार अहवाल तयार करणे चालू असून त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आल्याचेही किशोर राजे निंबाळकर यांनी म्हटले आहे

आता पाहू नुकसानीची स्थिती

एकूण क्षेत्रफळ- 45.27 लाख हेक्टर                

भरपाईची मागणी आहे- 4985 कोटीची

झालेल्या पंचनाम्याच्या आधारावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी रक्कम जमा होईल.

अशाप्रकारे किशोर राजे निंबाळकर म्हणाले जिल्ह्यांकडून 5000 हजार कोटींची मागणी होत आहे नगर पुणे सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर तसेच उस्मानाबाद या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा मार सोसावा लागला म्हणून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आमंत्रित केले आहेत की आपण यावे व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करावी.

Read  पी एम किसान योजनेत 6 मोठे बदल, सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार.

त्यानुसार आता त्यानुसार आता केंद्राचे IMTC चे पथक राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी करणार आहे आणि मग कुठेतरी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मदत मिळणार आहे त्या अगोदर नुकसानग्रस्तांना व पुरात मरण पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना ठाकरे सरकारकडून मदत दिली जाणार आहे.

Leave a Comment