group

अर्ज एक योजना अनेक महाडीबीटी पोर्टल योजना

अर्ज एक योजना अनेक महाडीबीटी पोर्टल योजना

कृषी विभागाने आता महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्यादृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबी न करता अर्ज करायचा आहे

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूंनी आपल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे

महाडीबीटी पोर्टल चे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे शेतकरी योजना हा पर्याय निवडावा शेतकरी स्वतःच्या मोबाईल संगणक लॅपटॉप टॅबलेट सामुदायिक सेवा केंद्र सीएससी, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इतर माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थ्यांची म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.

Read  Free Silai Machine Yojana Form Online 2022 | फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म Online 2022 .

वापर कर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्याची नोंदणी करावे. सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टल मध्ये नमूद करून त्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टल मध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणिक करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

पोर्टल वरील प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान वितरण करणे इतर सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. महाडीबीटी पोर्टल वर माहिती भरण्याची कारवाई सुरू झाली आहे यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरला असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही, मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात.

Read  Ahilyaa Sheli Yojana Maharashtra २०२२ | अहिल्या शेळी योजना महाराष्ट्र २०२२.

ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर कृषिविषयक योजनांचा लाभ मिळण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी दिनांक 31/ 12 /2020 अखेरपर्यंत आपला अर्ज भरावेत या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. तरी आव्हान करण्यात येते की सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी 20 डिसेंबर 2000 आधी आपले नाव नोंदणीकृत केले त्याच शेतकऱ्यांचे या योजनेसाठी अर्ज ग्राह्य धरल्या जातील.

Originally posted 2022-04-13 08:53:26.

group

Leave a Comment

x