30 कापूस खरेदी केंद्रे निश्चित, पणन महासंघाचा निर्णय

शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरी आला. तरी सुद्धा शेतकऱ्याच्या कापसाला कापूस खरेदी नव्हती. अशातच  सोयाबीन पाहिजे तसे झाले नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाले  अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्यायच उरला नाही. असे असताना अद्याप शासकीय खरेदीचा पत्ता नाही. दसरा उलटून गेला पण केंद्रे निश्चित झाली नव्हती. आंनदाची बातमी हीच की कापूस पणन महासंघाची केंद्र निश्‍चित झाली आहेत. पणन महासंघ यावर्षी 30 केंद्रावरून  राज्यात खरेदी करणार असले, असे असले तरी खरेदीचा मुहूर्त मात्र दिवाळीनंतरच होईल.

शेतकरी शासनाची कापूस खरेदी यंत्रणा म्हणून सीसीआय आणि पणन महासंघाकडे यांच्याकडे पाहतात. व्यापाऱ्याने भाव दिला नाही तरी शेतकऱ्यांना  केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळण्याची आशा लागून असते.  यंदा कापसाच्या हमीभावात वाढ झालेली दिसते आहे. आणि यामुळेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दरवर्षी दसऱ्याला कापूस खरेदीचा मुहूर्त साधला जात असतो. परंतु या वर्षी तसे झाले नाही. कारण व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस हमीदरापेक्षा कमी किमतीत खरेदी करीत असतांना दिसत आहेत.  अशा स्थितीत  शासनाच्या केंद्राची शेतकऱ्यांना गरज असताना पणन महासंघाकडून आता केंद्रांची निश्‍चिती 30 ठिकाणी करण्यात आली आहे.

Read  Hami Bhav खरिप हंगाम 2021 चे हमीभाव जाहीर

यावर्षी पणन महासंघ 30 केंद्रावरून खरेदी करणार असून याचे नियोजन महासंघाने केले आहे.  यंदाच्या हंगामात 125 कोटी क्‍विंटल कापूस खरेदी करण्याचा मानस पणन महासंघाचा आहे. परंतु खरेदी केंद्रे त्यामानाने कमी आहेत  तरी जिनिंगची संख्या खुप आहे  महासंघाने सांगितले आहे. पणन महसंघाचे केंद्र ठरले असले तरी सीसीआयच केंद्रांचा निर्णय मात्र बाकी आहे.  सीसीआयची खरेदी सुरू झाल्यानंतरच या केंद्रांवरून खरेदी सुरू होण्याची शक्‍यता सांगण्यात येत आहे.

 30 खरेदी केंद्रे

पणन महासंघाची केंद्रे खालील प्रमाणे:

नागपूर विभागात सावनेर, काटोल आणि तळेगाव-आष्टी- कारंजा या तीन गावांचे मिळून एक केंद्र करण्यात आले आहे. या 3 केंद्रांवर प्रत्येकी दोन दिवस कापूस खरेदी सुरू होणार आहे.  वणी विभागात  वरूड-चिमूर सह, मारेगाव, यवतमाळमध्ये आर्णीसह, यवतमाळ, अकोला विभागात बोरगाव मंजू , कारंजा लाड, कानशिवानी अमरावती विभागात  दर्यापूर, वरूड, मोर्शी, खामगाव येथे जळगाव-शेगाव, देऊळगाव राजा, औरंगाबाद विभागात , सिल्लोड-खामगाव (फाटा), बाला नगर, शेगाव-कर्जत, परभणी विभागात पाथरी-मोनोट, गंगाखेड,  परळी वैजनाथ विभागात धारूर, माजलगाव, केज,  नांदेड विभागात तामसा, भोकर,  आणि जळगाव येथे पारव्हा, धामणगाव-कासोद मालेगाव या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

Read  Soyabean Rate Today Market in Maharashtra | नवीन आजचे भाव महाराष्ट्र

आज पणन महासंघाने केंद्रांची निवड केली. यामध्ये सर्वच झोन मिळून 30 केंद्र सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली. या केंद्रांवर 125 कोटी क्‍विंटल कापूस खरेदी केल्या जाईल.  मागीलवर्षी पणन महासंघाने 94 लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. केंद्र कमी असले तरी जिनिंगची संख्या केंद्राच्या मानाने अधिक आहे. यामध्ये एका केंद्रावर रोज 600 गाठी तयार होतील.  इतका कापूस खरेदी करण्याचा प्रयत्न आमचा आहे. – असे राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ यांनी सांगितले.

Leave a Comment