90% Subsidy on Shilai Machine अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन, अर्ज सादर करावयाची ही आहे जाणून घ्या शेवटची तारीख….!
नांदेड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांकरता मुलींकरता 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन सातवी ते बारावी कक्षाच्या मुलींसाठी मोफत प्रशिक्षण याच बरोबर आपण पहिल्यांदा ग्रामीण भागातील मुलींकरता – महिलांकरता ब्युटी पार्लर प्रशिक्षण त्याप्रमाणे फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण, कॉम्प्युटर टाईप रायटिंग अशा प्रकारचे विविध कोर्स जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी मोफत किंवा 90% अनुदानावर अर्ज मागविण्यात येत आहेत. नांदेड जिल्हा परिषदेचे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी इच्छुक लाभार्थ्यांना 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा अर्ज विहित नमुन्यातील अर्ज असावा.
योजना
1) ग्रामीण महिलां व मुलींना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन पुरविण्यात येणार.
2) 7 वि ते 1व पर्यंत मुलींना MSCIT प्रशिक्षण देण्यात येणार.
3) ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशीन चालविण्याचे देखील प्रशिक्षण देण्यात येणार.
4) कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण तसेच फॅशनचे डिझायनिंग प्रशिक्षण दिले जाणार.
या योजना असणार आहेत. लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावे लागतील. अटी व शर्ती काय असतील? पाहुया सविस्तर…
अटी व शर्ती :
1) 15 फेब्रुवारीपर्यत विहित नमुन्यातील अर्ज सादर करा.
2) लाभार्थी नांदेड जिल्ह्यातील राशिवासी असणे गरजेचे आहे.
3) मागासवर्गीय असाल तर जातीचे प्रमाणपत्र असावे.
4) महिला ही दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील किंवा 2020-21 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारच्या आत असणे गरजेचे आहे.
5) लाभार्थ्यांकडे शिलाई मशीनचे प्रमाणपत्र असावे.
6) लाभार्थ्यांला 10 टक्के लाभार्थी हिस्सा भरणा करावा लागणार आहे.
7) आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, वस्तू खरेदीचे GST सह पावती असणे गरजेचे.
या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा. ही माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी दिली आहे.
90% Subsidy on Shilai Machine माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
9699702818
Shilai mashin