Mavinyapurn Yojana Mahiti | नाविन्यपूर्ण योजनेमार्फत दुधाळ गाई म्हशी वाटप अनुदान योजना

Mavinyapurn Yojana Mahiti मित्रांनो 4 डिसेंबर 2021 पासून नाविन्यपूर्ण योजने मार्फत दुधाळ गाई म्हशी गट वाटप योजना याकरता अर्ज कसा करायचा, गाई-म्हशी यांच्या करता किती अनुदान मिळेल पात्रता व निवडीचे निकष कोणते राहतील याबद्दल ची संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघूया.

नाविन्यपूर्ण योजना ही 2021 – 22 या वर्षाकरिता राबवण्यात येणार आहे, पुणे अहमदनगर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा मुंबई तसेच मुंबई उपनगरे या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार नाही. राज्य शासनाकडून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या या वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत देशी गाय संकरित गाय याच्यावर तसेच जर्सी म्हैस, मुरा म्हैस, जाफराबादी, गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, लाल कंधारी, थारपारकर देऊनी डांगी, गवळाऊ या जातीच्या गाई मशीन करिता अनुदान दिले जाणार आहे.

Read  Farmers Unique ID | शेतकऱ्यांना मिळेल युनिक आयडी

कोण अर्ज करू शकेल?

महिला बचत गट

अल्पभूधारक (दोन हेक्‍टर पर्यंतचे शेतकरी)

सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रामध्ये नोंद असलेले)

गाई म्हशी गटाची किंमत खालील प्रमाणे

प्रति गाय / प्रति म्हैस 40 हजार रुपये दोन जनावरांचा गट 80 हजार रुपये.

तीन वर्षाचा विमा रक्कम – 5061 रू.

किमतीनुसार शासकीय अनुदान व स्व हिस्सा

शासकीय अनुदान अनुसूचित जाती जमाती करता 75%

63796 रू 

स्व हिस्सा अनुसूचित जाती जमाती करता 25%

21265 रू 

सर्वसाधारण करिता शासकीय अनुदान 50%

Read  आता पेटीएमवर बुक करा सिलेंडर Book Cylinder on Paytm

42531 रू 

स्व हिस्सा सर्वसाधारण 50%

42531 रू 

जोडावयाची कागदपत्रे

आधार कार्ड

सातबारा

8 अ

अपत्य दाखला स्वघोषणापत्र

फोटो ओळख पत्राची सत्यप्रत

सातबारा  मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कटूंबाचे संमतीपत्र अथवा दुसर्‍याची जमीन भाडे तत्त्वावर घेतल्यास करारनामा

अनुसूचित जाती जमातीचे असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत

दारिद्र रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र

रहिवाशाचे प्रमाणपत्र

बँकेचे पासबुक

कुटुंब प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड

वय किंवा जन्मतारखेचा दाखला

बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

दिव्यांगा असल्यास त्याचा दाखला

प्रशिक्षण घेत असल्यास प्रमाणपत्राची प्रत

रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्ड ची सत्यप्रत

शैक्षणिक पात्रतेचा दाखला

अर्ज करण्यासाठी वेबसाईट

https://ah.mahabms.com

 

Read  Sarpanch Upsarpanch mandhan सरपंच व उपसरपंच मानधन information in Marathi language |

 

 

 

 

 

Leave a Comment