Sarpanch Upsarpanch mandhan सरपंच व उपसरपंच मानधन information in Marathi language |

Sarpanch Upsarpanch mandhan – राज्य सरकारने सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही आता उपसरपंचांनाही लाभ मिळणार आहे. सरपंच व उपसरपंच गावाच्या विकासासाठी सतत धडपडत असतात. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून देण्यात येत असणारा पगार त्यालाच मानधन असे म्हणतात तर चला मग पाहूया त्यांच्या विषयी माहिती.

सरपंच व उपसरपंच मानधन :
Sarpanch, honorarium mandhan

ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार सरपंचांना महिन्याला 3000 रुपयापासून 5000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. शिवाय उपसरपंचांना आता लोकसंख्येनुसार 1000 ते 2000 रुपये मानधन मिळणार आहे. कारण विकासामध्ये पंचायतराज संस्थेचा खूप मोठा वाटा असतो. ग्रामपंचायतीच्या प्रमुख असलेल्या सरपंचाला फार मोठी जबाबदारी पार पाडावी लागत असते. घटनादुरुस्तीमुळे सरपंचाला पूर्वीपेक्षा अधिक अधिकार व कर्तव्य प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्या ग्रामपंचायतीचा कारभार यांचा भार देखील तितकाच वाढलेला आहे.

काळाच्या ओघात वाढलेल्या महागाईमुळे राज्यातील विविध सरपंच घटना संस्था व लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी सरपंच मानधन सरपंच पगार वाढीसाठी शासनाकडे सतत मागणी होत असताना दिसते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्याकारणाने पूर्वी सरपंच उपसरपंच मानधन व सदस्यांना बैठक भत्ता देण्यात येत नव्हता नंतर ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णय एक नुसार ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न विचारात घेता सरपंचाला मानधन देण्याची सुरुवात करण्यात आली.

Read  Atiwrushti Nuksan Bharpai Yadi | अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी

राज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन : वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील 27 हजार 854 सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या योजनेचा 1 जुलै 2019 पासून लाभ मिळणार आहे.

सरपंच मानधनवाढ :

पूर्वी सरपंचांना मानधन मिळत नव्हते दिनांक 21 जानेवारी 2000 पासून सरपंचांना मानधन व ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता देण्याची सुरुवात झाली. सुरुवातीला सरपंचांना ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न लक्षात घेऊन सरपंचांना लोकसंख्येनुसार 200, 300व 400रुपये इतके मानधन दरमहा ग्रामपंचायतीकडून देण्यात येत होते आणि ग्रामपंचायत सदस्यांना प्रति बैठक भत्ता दरमहा रुपये 10 इतका भत्ता देय होता. एक जुलै 2009 पासून ग्रामपंचायती लोकं संख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना धर्म हा चारशे सहाशे 880 मानधनात वाढ केली होती आणि ग्रामपंचायत सदस्य बैठक भत्ता दहा वरून प्रति पंचवीस रुपये बैठक भत्ता अशी वाढ झाली.

6 सप्टेंबर 2014 चा शासनाच्या निर्णयानुसार सरपंच मानधन 1000, 1500 व 2000 अशी वाढ करण्यात आली. तर सदस्य बैठक भत्ता दोनशे रुपये प्रति बैठक अशी वाढ झाली. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 30 जुलै 2019 रोजी सरपंच मानधन बैठक बैठक भत्त्यात पुढील प्रमाणे वाढ करण्यात आली. मानधन वाढीसोबत उपसरपंच यांना मानधन देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला.

Read  आता पेटीएमवर बुक करा सिलेंडर Book Cylinder on Paytm

सरपंच उपसरपंच मानधन 2021:

सरपंच उपसरपंच मानधन 2021 मध्ये ग्रामपंचायतींची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच उपसरपंच यांना खालीलप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

0-2000 लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत मानधन

सरपंच दरमहा मानधन ₹3000₹
उपसरपंच दरमहा मानधन 1000₹
शासन अनुदान टक्केवारी 75%
सरपंच अनुदान रक्कम 2250₹
उपसरपंच अनुदान रक्कम 750 ₹

2001 ते 8000 लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत मानधन :

सरपंच दरमहा मानधन 4000₹
उपसरपंच दरमहा मानधन 1500₹
शासन अनुदान टक्केवारी 75%
सरपंच अनुदान रक्कम 3000₹
उपसरपंच अनुदान रक्कम 1125₹

8000 व त्यापेक्षा जास्त असलेल्या लोकसंख्या ग्रामपंचायतीचे मानधन

सरपंच दरमहा 5000₹
उपसरपंच दरमहा मानधन 2000₹
शासन अनुदान टक्केवारी 75 %
सरपंच अनुदान रक्कम 3750₹
उपसरपंच अनुदान रक्कम 1500₹

सरपंच मानधन थेट बँक खात्यात जमा :

राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार पाहणाऱ्या सरपंच, उपसरपंचांना देण्यात येणारे मासिक मानधन आता थेट बँकेत ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सरपंच, उपसरपंचांचे मानधन तसेच बैठकीच्या भत्त्यांचे मानधनही थेट बँकेत जमा होणार आहे.

14 ऑगस्ट 2019 रोजी च्या ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2019 / प्र.क. 255 / पंरा 3 नुसार ज्या प्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. ही योजना राबविण्यासाठी ग्रामविकास विभाग व एचडीएफसी (HDFC Bank )बँकेसोबत करारनामा करण्यात आलेला आहे.

Read  Online Gaming Adiction | ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यातून लहान मुलांना कसं वाचवायचं?

ऑनलाइन मानधनासाठी संगणक प्रणालीवर नोंदणी आवश्यक:

सरपंचाचे उपसरपंचाचे मानधन व सदस्यांचा बैठक भत्ता हा थेट बँक खात्यात जमा होणार असल्यास संबंधित कर्मचारी अधिकारी यांची संगणकीय प्रणालीवर नोंद करणे अनिवार्य आहे. ज्या सरपंच उपसरपंच सदस्य आणि अध्यापन संगणक प्रणाली म्हणून केले नसेल तसेच मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी आधार कार्ड बँक खात्याचा तपशील इत्यादी घेऊन त्वरित नोंदणी करावी अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 25 मार्च 2020 रोजी दिली होती.

मानधनात ग्रामसेवक यांची जबाबदारी व कर्तव्य :
सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भत्ता आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन ऑनलाईन पद्धतीने मिळवून देण्यासाठी संबंधित ग्रामविकास अधिकारी यांची जबाबदारी असते. ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती कार्यालयात उपस्थित आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, कर्मचारी निवृत्तीचा दिनांक भविष्य निर्वाह निधी इत्यादी बद्दलची माहिती संगणकामध्ये ग्रामसेवक यांनी अध्यावत करावयाची असते. गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनंतर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत वेतन किंवा मानधन अहवाल एचडीएफसी बँकेकडे पाठवला जातो. एचडीएफसी बँकेकडून त्याच कार्यालयीन दिवशी अथवा दुसर्‍या दिवशी संबंधितांच्या बँक खात्यात मानधन व वेतनाची रक्कम जमा केली जाते.

Sarpanch Upasarpanch Mandhan
सरपंच उपसरपंच मानधन ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.

Leave a Comment