Pandharpur Live Darshan आषाढी एकादशी पंढरपूर दर्शन 2021

Pandharpur Live Darshan पंढरपूर हे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी यांचे पवित्र स्थान. पंढरपूरला भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. सोलापूर पासून 72 किलोमीटरवर पंढरपूर वसलेले आहे. आषाढी एकादशीला वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात.

Pandharpur Live Darshan आषाढी एकादशी पंढरपूर दर्शन 2021

Pandharpur Live Darshan

विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचा 1195 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. पंढरपूर शहरामध्ये हिंदू देवतांची मंदिरे तसेच अनेक संतांचे मठ आहेत. पंढरपूर हे शहर भीमा म्हणजे चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे.

आषाढी व कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला भाविक खूप मोठ्या प्रमाणात येतात व तिथे सर्वात मोठी यात्रा सुद्धा भरते. तसे पंढरपुरात बाराही महिने नेहमीच महाराष्ट्रातील लगतच्या राज्यांमधून असंख्य भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

Read  Crop Loan Maharashtra List 2022 | Regular Karj Mafi List 2022 | नियमित कर्ज माफी योजना यादी

पंढरपूर लाईव्ह दर्शन करता येथे क्लिक करा

आषाढी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला दाखल होतात. दरवर्षी या पालखीमध्ये लाखोंच्या संख्येने लोक सामील होतात. विठ्ठल मंदिरामध्ये महापूजा, काकडा आरती, महानैवेद्य, पोशाख, धुपारती, पाद्यपूजा, शेजारती इत्यादी रोजी विधी पार पडतात. मुख्य मंदिरात प्रवेश करताना नामदेव पायरी दरवाजातून प्रवेश करावा लागतो.

Pandharpur wari

शहराचा उत्तरेस संत कैकाडी महाराज मठ आहे सर्व देव देवतांचे व संताचे दर्शन घडवणारे हे सुंदर असे स्थळ आहे. तुम्हाला हा मठ पाहण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन तास अवधी लागू शकतो.

बुधवार हा पंढरपुरात आठवड्यातील पवित्र वार समजला जातो एकादशी ही तिथी सर्वात पवित्र मानली जाते आषाढी एकादशी ची वारी, कार्तिकी एकादशीची वारी व माघ एकादशी वारी तसेच चैत्र एकादशी वारी हे चार महत्त्वाचे वारीचे उत्सव आहेत. आषाढी तसेच कार्तिकी वारी करता जवळपास आठ ते दहा लाखांचा वारकरी समुदाय उपस्थित राहतो.

Read  BSF Constable Tradesman Recruitment 2022 Online Form | बी एस एफ भरती 2022

Pandharpur Live Darshan येथे क्लिक करा

पावसाळा सुरू झाल्यानंतर आषाढी महिन्यांमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव असतो. सर्व शेतकरी शेतातील पावसाळा पावसाळ्यापूर्वी चे मशागत व पेरणी चे काम संपवून विठ्ठलाच्या वारीमध्ये सामील होत असतात. अनेक संतांच्या पालख्या पायी प्रवास करुन आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात व श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन मग माघारी फिरतात. तामिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधून पण वारकरी मोठ्या संख्येने वारीमध्ये सहभागी होत असतात.

Pandharpur

शेगांवहून संत गजानन महाराज, आळंदीहून संत ज्ञानेश्वर व देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत जवळपास 2 लाख वारकरी विविध दिंडी यांमधून पंढरपूरला मध्ये पायी प्रस्थान करत असतात. तसेच महाराष्ट्रामधील विविध ठिकाणांहून आणखी संतांच्या पालख्या प्रस्थान करतात त्यामध्ये जवळपास सात ते आठ लाख वारकरी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेतात.

Read  Ativrushti Anudan Bharpai 2021 Maharashtra | अतिवृष्टी अनुदान भरपाई 2021 महाराष्ट्र

विठ्ठल मंदिराला एकूण 8 प्रवेशद्वार आहेत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडील महाद्वार म्हणजेच नामदेव पायरी हे आहे. पंढरपुरामध्ये सर्व जाती धर्माच्या भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळतो व विठ्ठलाच्या चरणी माथा टेकण्यासाठी सर्वांना संधी मिळते. पदस्पर्श दर्शनाकरता साधारण दिवशी 2 ते 3 तास, साप्ताहिकाच्या सुट्टीला व एकादशीच्या दिवशी 4 ते 5 तास आणि यात्रेच्या काळामध्ये साधारणतः 35 तास लागतात. मुख्य दर्शन घेण्याकरता वेळेअभावी भक्तांना 25 मीटर लांब विठ्ठलाचे व 15 मीटर लांब रुक्मिणी चे दर्शन घ्यावे लागते.

Pandharpur Live Darshan आषाढी एकादशी पंढरपूर दर्शन 2021 हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आमच्या मराठी स्कूल Marathi School आणि Aai Marathi आई मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या

 

Leave a Comment