Corona Vaccine | 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना लस | कशी कराल नोंदणी

सध्या कोरोना (corona vaccine) रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होईल.

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर्ससोबत बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोरोना लस मोफत असेल, तर खासगी हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला यासाठी काही किंमत मोजावी लागेल. लस घेण्यासाठी CoWIN ऍपवर रेजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

Read  Mahalaxmi Madir Kolhapur Live Darshan महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर लाईव्ह दर्शन

रेजिस्ट्रेशनच्यावेळी तुमच्याकडे खालीलपैकी एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे corona vaccine

1)आधारकार्ड

2)पॅनकार्ड

3)मतदानकार्ड

4)ड्रायव्हिंग लायसेन्स

5)हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड

6)महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीम रोजगार कार्ड

7)पासपोर्ट

8)बँक/पोस्ट ऑफिसकडून जारी करण्यात आलेले पासबुक

9)पेन्शन डॉक्युमेंट

10)सर्विस आयडेन्टी कार्ड (केंद्रीय/राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले)

रेजिस्ट्रेशन कसे कराल

1)सर्वात प्रथम cowin.gov.in या वेबसाईटला भेट द्या

2)येथे आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर भरा

3)तुम्हाला ओटीपी मोबाईलवर मिळेल, नंबर टाकून रेजिस्ट्रेशन करा.

4)रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लसीकरणासाठी दिवस आणि वेळ ठरवू शकता.

5)हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही लस घेऊ शकता.

6)यावेळी तुम्हाली रेफ्रन्स (Reference id)आयडी मिळेल, याच्या माध्यमातून तुम्हाला लस सर्टिफिकेट मिळू शकते.

आई मराठी ब्लॉग जरूर वाचा

Read  Land Selling गुंठेवारीत जमिनीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध

कोरोना वितरणावरील निर्बंधही सरकारकडून शिथिल करण्यात आले आहेत. लस (corona vaccine )निर्मिती कंपन्या 50 टक्के पुरवठा केंद्र सरकारला करतील आणि उर्वरित 50 टक्के राज्य सरकार आणि ओपन मार्केटमध्ये करु शकणार आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय.

Leave a Comment