Farmers Unique ID | शेतकऱ्यांना मिळेल युनिक आयडी

Farmers Unique ID सरकार सध्या शेतकऱ्यांना युनिक आयडी कसा मिळेल या प्रक्रियेवर काम करत आहे. सरकारचे असे म्हणणे आहे की आतापर्यंत 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी जवळपास 5.50 कोटी शेतकऱ्यांचा डाटाबेस आम्ही तयार केला आहे ज्यांना 12 अंकी ओळखपत्र दिले जाणार आहे मंगळवारी लोकसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सध्या सरकार असे म्हणत आहे की या विशिष्ट ओळखपत्राच्या मदतीने शेतकऱ्यांच्या खूप सार्‍या समस्या सुटू शकणार आहेत शेतकरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ कोणत्याही त्रास हा विना घेऊ शकणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्याही मध्यस्थीची गरज भासणार नाही.

शेतकऱ्यांची ओळखपत्र बनण्याकरता ई-केवायसी ची पडताळणी होणे खूप गरजेचे आहे विविध योजनांच्या अंतर्गत लाभ प्राप्त करून घेण्याकरता विविध विभाग आणि कार्यालयांमध्ये वारंवार कागदपत्रे जमा करण्याची गरज यामुळे भासणार नाही.

Read  शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी Shetkari Karj Mafi

लोकसभेमध्ये याबाबतची माहिती मागवण्यात आली त्यावर नरेंद्र तोमर यांनी असे सांगितले की देशांमध्ये 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी 5.50 कोटी शेतकऱ्यांचा डाटाबेस आम्ही तयार केलेला आहे उर्वरित काम सध्या सुरू आहे ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दरवर्षी तीन वेळा 2 हजार रुपयांचा समान हप्त्यांमध्ये लाभ मिळतो आहे त्या शेतकऱ्यांना Farmers Unique ID आयडी प्राप्त होणार आहे.

सोपे होईल योजनांचा लाभ घेणे

देशात आणि राज्यांमध्ये अनेक कल्याणकारी कृषी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार चालवत आहे या योजनांचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेकरिता मेहनत घ्यावी लागते जर ओळखपत्र तयार झाले, तर योजनांचा लाभ घेणे खूप सोपे होणार आहे कृषी योजनांमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे चालू असतात ज्या चा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात परंतु ओळखपत्र तयार झाल्यानंतर अशा लोकांना चाप बसेल. यामुळे डिजिटल कृषी मिशनच्या या प्रयत्नामुळे कृषी क्षेत्रामध्ये पारदर्शकता सुद्धा येईल.

Read  PAN-Aadhaar Card Link | पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे?

शेतकरी मित्रांनो आमच्या बातमी मराठी या ब्लॉग ला सुद्धा अवश्य भेट द्या

 

Leave a Comment