Last Will and Testament | आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती अधिकार आहे?

Last Will and Testament संपत्तीवरून अनेक ठिकाणी वाद होत असताना दिसतात काही ठिकाणी आपल्याला लोक एकमेकांना मारायला देखील तयार होतात असे दिसते आणि संपत्तीवरून समाजामध्ये अघटित घटना घडत असतात.

संपत्तीच्या वादामध्ये अनेक लोकांना संपत्तीबद्दल फारशी माहिती नसते अपुऱ्या माहितीमुळे काही लोकांना त्यांच्या हक्काची संपत्ती मिळत नाही आणि काही दुष्ट लोक दुसऱ्यांच्या वाट्याची संपत्ती अडकून बसतात त्यामुळे आज या लेखांमध्ये या सर्व गोष्टींबद्दल माहिती आम्ही देणार आहोत.

पुर्वापार चालत आलेल्या संपत्तीमध्ये वाटप कसे करायचे हा हा विषय अतिशय किचकट आहे अशा संपत्तीमध्ये देशांमधील अनेक खटले वर्षानुवर्षे चालत राहतात आणि मौल्यवान असलेला वेळ देखील आपला वेळ वाया जातो त्या अनुषंगाने काही गोष्टींचे आपण भान ठेवणे खूप गरजेचे आहे.

Read  तुमच्या जमिनीची सरकारी किंमत जाणून घ्या Government Land Prices

आज आपण या लेखांमध्ये आजोबाच्या मालमत्तेवर नातवाच्या हक्काबद्दल बोलत आहोत यावर बोलायचे झाले तर जन्मापासून आजोबांकडून मिळालेल्या संपत्तीवर नातवाचा किंवा नातीचा पूर्ण हक्क आहे नातवाच्या किंवा नातीच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या मृत्यूशी त्यांचा काही संबंध नाही नातवंडं त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आजोबांच्या मालमत्तेमध्ये भागधारक बनत असतो.

आजोबांची मालमत्ता

सर संपत्ती वडील आजोबा किंवा पंजोबा इत्यादींकडून वारसाहक्काने मिळत असेल तर त्याला वडिलोपार्जित मालमत्ता म्हणतात वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा देण्याचा अधिकार जन्माने मिळवला जात असतो जो इतर प्रकारच्या वारस आता पेक्षा वेगळा असतो मालमत्ता अधिकाराच्या इतर पद्धतीमध्ये मालमत्तेच्या मालकाच्या मृत्यूनंतर वारसास हक्कानुसार संपत्ती दिल्या जाते.

Read  Maha Bhumi Abhilekh जमिनीची शासकीय मोजणी भूमी अभिलेख

वडिलोपार्जित असलेल्या संपत्तीत हक्क

वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास वडिलोपार्जित मालमत्तेतील फक्त प्रति प्रदेश आधारावर निर्धारित केला जात असतो त्यामुळे प्रत्येक पीढीचा वाटा आधी ठरवला जातो आणि नंतर तो वाटा पुढच्या पिढीसाठी उपविभागीय केला जात असतो, जो त्यांच्या पूर्ववर्तीना वारसा म्हणून मिळालेला असतो.

नातवंडांचा हक्क कसा असतो?

वडिलोपार्जित मालमत्ता मध्ये नातवंडांचा समान वाटा असतो. नातवाने नातवाच्या नातवाला मालमत्तेतील हिस्सा देण्यास नकार दिल्यास नातवाला अंतरिम दिलासा मिळण्याकरिता याचीकांसह घोषणा आणि विभाजनासाठी दिवाणी खटला दाखल करु शकतो, म्हणजेच कायद्यात दिलेल्या अधिकारांपासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही.

आजोबांनी स्वकष्टाने मिळवलेली मालमत्ता

आजोबांच्या स्वत अधिग्रहीत असलेली मालमत्ता म्हणजे आजोबांची स्वकष्टाने मिळवलेली किंवा विकत घेतलेली मालमत्ता यावर नातवाचा जन्मसिद्ध हक्क नाही. जर ती संपत्ती नातवाच्या वडिलांना म्हणजे आजोबांच्या मुलाला दिली गेली असेल तरच त्यावर नातवाचा हक्क राहील.

Read  1 कोटी 50 लाख सातबारा उतारे झाले संगणकीकृत, बघा नवीन सातबारा कसा दिसेल

कायद्याप्रमाणे हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 अंतर्गत वारस म्हणून त्याला दावा करण्याचा अधिकार नाही आजोबा ही मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला देऊ शकतात, तसेच आजोबा मृत्युपत्रा शिवाय मरण पावले तर या संपत्तीवर फक्त त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचाच हक्क असेल. मृत व्यक्तीच्या पत्नी, मुलगी किंवा मुली यांना वारसाहक्काने  मिळालेली मालमत्ता त्यांची वैयक्तिक मालमत्ता मानली जाईल आणि त्या मालमत्तेवर अन्य कोणताही व्यक्ती दावा करू शकणार नाही.

 

Leave a Comment