group

Maha Bhumi Abhilekh जमिनीची शासकीय मोजणी भूमी अभिलेख

शेतकरी मित्रांनो शेतीची मोजणी Maha Bhumi Abhilekh zकरण्याला खूप वेळ लागतो आणि त्यात जर शासकीय मोजणी करायचं म्हटलं तर फारच डोकेदुखी असते कारण शासकीय मोजणी ही लवकर केल्या जात नाही किंवा त्यासाठी खूप उशीर लागत असतो. म्हणूनच भूमी अभिलेख कार्यालयाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे.

जमिनीची शासकीय मोजणी भूमी अभिलेख Maha Bhumi Abhilekh

जमीन मोजणी Maha Bhumi Abhilekh करता जीपीएस रीडिंग येण्यासाठी चा वेळ कमी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडिया च्या मदतीने राज्यामध्ये 77 ठिकाणी कॉर्स म्हणजेच कंटिन्यूअस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन उभारले जाणार आहेत त्यामुळे कॉर्सच्या आधारे जीपीएस रेडींग फक्त 30 सेकंदांमध्ये घेता येणार आहे आणि त्यामुळेच आज पर्यंत जमीन मोजणी करता जो वेळ लागणार होता तो कमी लागणार आहे.

Read  आपल्या जमिनीची शासकीय मोजणी कशी करायची? काय आहे पद्धती? | Jamin Mojani

कॉर्स स्टेशनची उभारणी Maha Bhumi Abhilekh

येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये कॉर्स स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. तर प्रत्यक्ष कॉर्स स्टेशन मार्फत जमिनीची मोजणी महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. सध्या आपण बघतो की 5 एकर जमीन मोजण्यासाठी 1 दिवस लागतो. कॉर्समार्फत जीपीएस रीडिंग जलद मिळत असल्या कारणाने 5 एकर जमिनीची मोजणी करण्यासाठी फक्त अर्धा तास लागणार आहे सध्याची जमीन मोजणी होते ही ईटीएस मशीन द्वारे होते यासाठी खूप वेळ लागतो. Maha Bhumi Abhilekh

आता जमिनीवरची Maha Bhumi Abhilekh जीपीएस रिडींग घेवून त्या क्षेत्रफळाचे अक्षांश व रेखांश घेतले जाते त्यामुळे जमिनीची मोजणी करणे सुलभ ठरते सध्याचे तंत्रज्ञान असतात आहे त्यासाठी जीपीएस रिडींग घेण्याकरता चार तासापर्यंत वेळ लागतो म्हणून जीपीएस रेडींग वेळ कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या भुमिअभिलेख विभागामार्फत सर्वे ऑफ इंडिया च्या मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीची मोजणी करण्यात येणार आहे.

Read  Last Will and Testament | आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती अधिकार आहे?

जीपीएस रीडिंग

कॉर्सच्या मदतीने जीपीएस रीडिंग फक्त 30 सेकंदात घेण्यात येणार आहे. त्यामुळेच भूमी अभिलेख विभागाने संपूर्ण महाराष्ट्रभर कॉर्स स्टेशनचे जाळे उभारले आहे. एक कॉर्स स्टेशन आपल्या भोवतालच्या 35 किलोमीटरच्या त्रिज्येच्या क्षेत्रात जीपीएस चे रीडिंग देणार आहे हे जीपीएस रीडिंग वर दिसणार आहे.

राज्यामध्ये सध्या चारशे रोव्हर घेतले जाणार आहेत. कॉर्समुळे नवीन नकाशे बनण्यासाठी मदत मिळणार आहे, त्याचबरोबर जीपीएस रीडींग अचूक येणार आहे, जमीन मोजणीत Maha Bhumi Abhilekh सुद्धा अचूकता येईल, त्याचबरोबर जमिनीचे पोटहिस्से करणे सुलभ होईल, एका जमिनीची अनेक जणांना विक्री करणे याला आळा बसेल.

Originally posted 2022-04-17 09:21:13.

group

Leave a Comment

x