Talathi Bharti Syllabus In Marathi 2023 | तलाठी भरती अभ्यासक्रम २०२३ नवीन माहिती .

(Talathi Bharti Syllabus In Marathi 2023) नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तलाठी भरती बद्दल नवीन अपडेट आलेली आहे चला तर पुढे पाहूया. मागील काही दिवसाआधी 4122 पदे तलाठी भरतीसाठी (तलाठी भरती अभ्यासक्रम २०२३ नवीन माहिती .) जाहीर करण्यात आली होती आणि आता या भरतीला राज्य मंत्रिमंडळ मान्यता मिळालेली आहे. या सर्व पदांची आता भरती होणार आहे. भरती एम पी एस सी मार्फत होणार आहे. चला तर पुढे पाहूया यासाठी आपले वय काय असावे ?
यासाठी विद्यार्थी मित्रांचे वय हे 19 ते 38 वर्षे असावे यामध्ये मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूट आहे ती म्हणजे एकोणवीस वर्ष ते 43 वर्ष असले तरी चालेल.
या भरती मार्फत नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर मिळू शकते.

Read  Solar Penal Yojana online Form 2022 | सोलर पैनल योजना ओनलाईन फॉर्म २०२२ .

तलाठी भरती नोकरीसाठी किती पगार मिळणार आहे ?
या भरती मार्फत उमेदवारांना 5200 ते 20200 + ग्रेड पे 2400 असा पगार मिळणार आहे.

चला तर पुढे पाहूया परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ते .
इंग्रजी भाषा 25 प्रश्न 50 गुण
मराठी भाषा 25 प्रश्न 50 गुण
सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण
बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण
या परीक्षेसाठी प्रश्नांची संख्या ही शंभर असून या 100 प्रश्नासाठी 200 गुण राहणार आहेत.

तर विद्यार्थी मित्रांनो आताच तयारीला लागा या भरतीची चांगली तयारी करा. आपल्यातून कित्येक जणांचे स्वप्न असेल सरकारी नोकरी करण्याची आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी थोडी तयारी करावी लागणार आहे वरील दिलेल्या परीक्षेच्या स्वरूपाने तुम्ही तयारी करू शकता आणि या भरतीमध्ये चांगल्या अंकांनी पास होऊ शकतात.

Read  Ration Card Changes | आता यांनाच मिळेल रेशन

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment