Aadhaar Card Is Important For School Admission | शाळेत प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे | विद्यार्थी मित्रांसाठी व त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना जाहीर झाली आहे. आता शाळेमध्ये विद्यार्थी मित्रांचे किंवा मैत्रिणींच्या आधार कार्ड सोबतच पालकांचेही आधार कार्ड तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. असे करण्यामागे बोगस विद्यार्थी पटसंख्या याला आळा घालण्यासाठी असा निर्णय करण्यात आला आहे. याबाबत समितीमध्ये चर्चा होत असताना निवृत्त न्यायमूर्ती पी व्ही हरदास यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला आहे. या मार्फतच आता शाळा प्रवेशाबाबत नवीन अटी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सहन कराव्या लागणार आहेत. ह्या अटी विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या चांगल्यासाठीच आहेत. या अटीन मधील एक अट म्हणजे विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा त्याच्या पालकाच्या आधार कार्ड हे सादर करावे लागणार आहे किंवा त्यावेळी पालक हे हजर करू शकले नाही तर तात्पुरता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
आता विद्यार्थी मित्रांची प्रत्यक्ष पडताळणी ही शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते एका वर्षा मधून दोन वेळा होणार आहे . आणि शाळेमध्ये काही दुरुपयोग झाल्यास ते त्यावर कारवाई पण करू शकतात. आता प्रवेश पत्रावर पालकांची स्वाक्षरी असणे अत्यंत गरजेचे आहे व अर्ज भरण्याच्या फॉर्म भर विद्यार्थी व पालकांचे फोटो लावलेले असणे गरजेचे आहे. विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये प्रवेश घेतील आता पालकांकडून दोन प्रतींमध्ये अर्ज भरून घेतल्या जातील. अर्जासोबत आता आधार कार्डही महत्त्वाचे कागदपत्र केले आहे. आता प्रवेशावेळी आधार कार्ड च्या प्रती तुम्हाला अर्ज सोबत द्याव्या लागतील. विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र आता आधार कार्ड सोबत जोडल्या जाणार आहेत याने विद्यार्थी मित्रांना फायदा होणार आहे.