Aadhaar Seva Kendra अकोला जिल्ह्यात नवीन आधार सेवा केंद्र ऑनलाईन अर्ज सुरु..! इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करा…. जाणून घ्या त्याविषयी माहिती..
अकोला जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 21 जागांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेल्या आहे. यासाठी अर्ज कसा करायचा? काय काय कागदपत्रे लागतील? याबद्दलची संपूर्ण माहिती पोस्टच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या माध्यमातून आधार केंद्र करता जाहिरात काढण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याची माहिती 3/2/2022
रोजी प्रकाशित करून या अर्जांची छाननी 7/3/2022 रोजी करून याचा अंतिम निकाल हा 10 मार्च 2022 रोजी दिला जाणार आहे.
त्यांच्यासाठी आपण पाहिलं अकोला जिल्ह्यातील रिक्त असलेल्या अकोला तालुक्यामध्ये कापशी, पुरणखेळ, पळसो, आगर, भोसर या गावांसाठी तर अकोट तालुक्यातील उमरा, अकोलखेड, आसेगाव आणि कुटासा या गावांसाठी बाळापुर तालुक्यामधील पारस, निंबा, उरळ या गावासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे तर मुर्तीजापुर तालुक्यामध्ये हादगाव जामठी, बुद्रुक, शेंदूरवादा याचप्रमाणे निंबा आणि नागपूरी या गावांसाठी तर बार्शीटाकळी तालुक्यामध्ये धावा आणि खेड तालुक्यांमध्ये मालेगाव आणि पाथर्डे या गावासाठी आहे अर्ज मागवण्यात आले.
मित्रांनो त्यासाठी एक ऑनलाईन अर्ज तयार करायचा आहे आणि हा अर्ज पीडीएफच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे. त्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स खालील प्रमाणे.
1) नमुना अर्ज
2) आधार कार्ड
3) पॅन कार्ड
4) आधार यन एस आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र
5) जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
6) शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र जोडायचे आहे.
अटी व शर्ती:
इच्छुक असलेल्या अर्जदारांनी दिनांक 15/2/2022 ते 25 /2 / 2022 या कालावधीत या कार्यालयाचे संकेतस्थळ www.akola.gov.in वरून विहित अर्ज डाउनलोड करून या कार्यालयात कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत दिनांक 25/2/2022 रोजी सादर करावा.
त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घेणे गरजेचे आहे अर्जामध्ये सर्व माहिती परिपूर्ण भरावी तसेच कोणत्याही प्रकारची खोडतोड करू नये.
अर्जदाराकडे आपले सेवा केंद्र कार्यान्वित असणे आवश्यक आहे. नसल्यास अर्जाचा विचार करण्यात येणार नाही सेतू केंद्र चालक स्वतः एनएससीआयटी सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण असावा.
अर्जासोबत आधार एन एस सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
आधार संच व आधार केंद्र मंजूर झाल्यानंतर सदर किट ही महाआईटी यांचेमार्फत मिळत असल्याने त्यांचे निर्देशानुसार 50 हजार रुपयाची बँक गॅरंटी फिक्स डिपॉझिट स्वरूपात देणे अनिवार्य राहील.
एका केंद्रासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास व ज्येष्ठतेनुसार प्राधान्य देण्यात येईल तालुकास्तरावर व ग्रामीण भागातील केंद्रांना तहसीलदार ही जागा निश्चित करून देतील व आधार सेवा केंद्र चालकांना ते मान्य राहील.
सेतू केंद्र चालक फक्त एकच आधार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतात. त्यांच्या कुटुंबातून दुसरा अर्ज असल्यास तो ग्राह्य धरण्यात येणार नाही.
यापूर्वीच्या सेतू केंद्र संचालकांकडे आधार केंद्र मंजूर आहे असे अर्जदार व त्यांचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असणार नाही. अर्जामध्ये जर माहिती चुकीची असेल तर त्यांचा अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
आधार सेवा केंद्र ज्या ठिकाणी देण्यात येईल त्याच ठिकाणी ते कार्यरत असणे आवश्यक राहील. आधार सेवा केंद्राची जागा बदलल्या त्यांचे आधार सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र तात्काळ बंद करण्यात येईल.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे लागेल तसेच त्यांनी दिलेल्या कॅम्पमध्ये आधार नोंदणी संच लावून अहवाल सादर करावा लागेल.
नागरीकांची तक्रार असल्यास आधार सेवा केंद्राची चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 16/ 9/ 2017 रोजी प्रसिद्ध केलेल्या आधार सेवा केंद्रा बाबतचा शासन निर्णय नमूद निर्देश राज्य अधीन राहून आधार केंद्रची नियुक्ती व कार्यान्वित केली जाईल.
त्यांना सर्व अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील. तुम्हालाही अकोला जिल्ह्यासाठी नवीन आधार केंद्र सेवेसाठी अर्ज भरायचा असेल तर तुम्ही करू शकता.
Aadhaar Seva Kendra ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.