Aadhaar Smart Card | 50 रुपयांमध्ये घरी बोलवा आधार स्मार्ट कार्ड

Aadhaar Smart Card मित्रांनो आपण बाजारामध्ये बनवलेले आधार स्मार्ट कार्ड अवैध असून, हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही अशा प्रकारचे स्पष्टीकरण आधारकार्ड बनवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI आधार प्राधिकरणाने म्हटलेले आहे. आधारची नोंदणी केल्यानंतर लोक बाजारातून पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेतात अशी काढ आता चालणार नाहीत असे आधार प्राधिकरणाने समाज माध्यमात जारी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलेले आहे. बाजारामध्ये बनवलेल्या आधार च्या स्मार्ट काळात अनेक सुरक्षाविषयक उणिवा असतात खरे म्हणजे अशा कार्ड मध्ये कोणते सुरक्षाविषयक फिचर नसते, त्यामुळेच या कारणांना आम्ही अवैद्य घोषित करीत आहोत असे युआयडीएआय प्राधिकरणाने म्हटले आहे.

कसे मिळवायचे आधार कार्ड?

यु आय डी ए आय प्राधिकरणाने म्हटले की मूळ आधार कार्डच्या https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटच्या मदतीने आपण नवीन आधार कार्ड प्राप्त करू शकता या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड या पर्यायावर क्लिक करा बारा अंकी आधार क्रमांक अथवा 28 अंकी नोंदणी क्रमांक टाका सुरक्षा कोड भरा त्यानंतर तुमच्या मोबाईल वर ओटीपी तो ओटीपी टाकून अटी व शर्ती स्वीकृत करा ओटीपी पडताळणीसाठी सबमिट बटन दाबल्यावर पेमेंट ऑप्शन वर क्लिक करा.  क्रेडिट-डेबिट पाठवा नेट बँकिंग ने पैसे अदा करा. पैसे अदा झाल्यानंतर पावती मिळेल. नंतर कार्ड पोस्टाने घरपोच मिळेल.

Read  Aadhaar-Voter Card Link | आधार आणि मतदान कार्ड लिंक कसे करायचे? जाणून घ्या सोपी पद्धती

पीवीसी कार्ड पाहिजे असल्यास

मित्रांनो आपल्याला आधारचे पीव्हीसी कार्ड पाहिजे असल्यास केवळ 50 रुपये भरून आपण अधिकृतरित्या ते मिळवू शकतो. ते प्राधिकरणाकडून पोस्टाने तुम्हाला पाठवले जाईल. मूळ आधार कार्डमध्ये किंवा पीव्हीसी कार्ड मध्ये डिजिटल साईंन, सुरक्षित क्यूआर कोड,  छायाचित्रासह  त्यामध्ये लोकसंख्याकी तपशील म्हणजेच डेमोग्राफिक डिटेल असते तसेच सर्व सुरक्षा  फिचरही त्यामध्ये असतात. यु आय डी ए आय ने म्हटले आहे की मूळ कारणांमध्ये सुरक्षित किंवा आर कोड होलोग्राम मायक्रो टेक्स्ट कार्ड जारी केल्याची व प्रिंट केल्याची तारीख लोक सांख्यिकी तपशील हे फीचर्स असतात.

नक्की वाचा बातमी मराठीआई मराठी

Leave a Comment