अज्ञात चोरट्यांनी मोबाइल शॉपी फोडली, 34600 रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

देऊळगाव राजा : शहरातील जालना रोडवरील मोबाइल शॉपीचे शटर तोडून विविध प्रकारचे मोबाइल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला.

शहरातील जुना जालना रोडवर फिर्यादी महादेव अण्णासाहेब वाघमारे यांचे मोबाइल शॉपीचे दुकान आहे. २१ जानेवारीला सायंकाळी दुकान बंद करून ते घरी गेले होते. रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत

Read  गोडाऊन मधून सोयाबीन चोरून नेत असताना एकास रंगेहात पकडले, पोस्टेला गुन्हा दाखल

Leave a Comment