group

Electricity bill | वीज ग्राहकांसाठी मोठी घोषणा व्याज व विलंब शुल्क माफ

electricity bill नितीन राऊत यांनी केली वीज ग्राहकांसाठी मोठी घोषणा….. व्याज व विलंब शुल्क माफ…

वीज ग्राहकांसाठी नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे, व्याज आणि विलंब शुल्क माफ कारण कोरोनाच्या काळात आलेले भरमसाठ बिल (electricity bill) अजूनही लोक फेडत आहे. अशातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नवीन घोषणा केली आहे.

सर्व वीज ग्राहकांनी एक-रक्कमी थकबाकी भरल्यास व्याज व विलंब शुल्क माफ केले जातील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. जागतिक पर्यटन केंद्र लोणार इथं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. जर वीज ग्राहकांनी एक-रक्कमी थकबाकी भरले तर सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ केले जाणार आहे.

Read  ठिबक सिंचन योजना अनुदान Thinbak Sinchan Yojana Anudan

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती नितीन राऊत  यांनी दिली. सोबतच उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. त्याचबरोबर लघुदाब वीज ग्राहकांनी एक रक्कमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रक्कम माफ केली जाणार आहे, अशी घोषणाही राऊत यांनी केली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व इतरांनाही शेअर करा.

group

Leave a Comment

x