राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त प्रहार जनशक्ती पक्ष, महेश अर्बन व खामगाव निधी लि.च्या वतीने शहरातील गरजूंना साहित्य वाटप

मलकापूर:- राष्ट्रमाता, राजमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त प्रहार जनशक्ती पक्ष, महेश अर्बन व खामगाव निधी लि.च्या वतीने शहरातील गोरगरीब व रस्त्याच्या कडेला राहणार्‍या महिला व लहान मुलांना जेवण व कपड्यांचे वितरण करण्यात आले.

नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलणार्‍या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकारातून तसेच महेश अर्बन व खामगाव निधी लि. च्या सहकार्याने माँ जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधीत शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या व गोरगरीब महिला व बालकांना गोड जेवण तसेच साडी-चोळी व लहान मुलांना कपड्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, प्रा.संजय पाटील, डोळसे सर, महेश अर्बनचे व्यवस्थापक सुनिल अग्रवाल, संचालक नंदलाल राठी, खामगाव निधी लि. चे रविंद्र बोंडे, आकाश जाधव, प्रहार तालुका प्रमुख अजित फुंदे, बलराम बावस्कार, शिवाजी भगत, अमोल पाटील, निलेश चोपडे, शुभांगी डवले, संतोष वाघ, अपरेशराजे तुपकरी, अशोक गाढवे, उमेश जाधव, शोभा पालवे, मयुर लढ्ढा यासह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Comment