राज्यात पुन्हा पावसाचा तडाखा Hawaman Andaz Maharashtra

हवामान Hawaman Andaz Maharashtra खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या 36 तासात मध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे व काही भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच शेतकरी मित्रांनो काही भागांमध्ये गारपिटीचा सुद्धा इशारा दिलेला आहे, तरी शेतकरी मित्रांनो आपण शेताची काळजी व जनावरांची काळजी घ्या. त्यामुळे आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये गारपीटीची शक्यता तज्ञांकडून वर्तवली आहे.

तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी रिमझिम पाऊस तर, मुंबईमध्ये पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून 36 तासात राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाकडून अंदाज वर्तवला आहे.

Read  राज्यात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता | Non Seasonal Rain | Weather in Maharashtra

2 दिवस पावसाचा जोर जास्त असेल 13 ते 15 डिसेंबर या दरम्यान पुन्हा एकदा रिमझिम पाऊस ढगाळ वातावरण राहणार आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण व थंडीची लाट पूर्णपणे गायब झाल्यासारखी आहे. दिनांक.17 पासून तीव्र थंडीची लाट येणार. दिनांक 17 च्या पहाटेला धुके पाहायला मिळतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांची काळजी घ्या.

●माहितीस्तव Hawaman Andaz Maharashtra

16 तारखे पर्यंत मुंबई ,नाशिक ,कोकण पट्टी ,सातारा ,नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा ,अमरावती, सांगली, कोल्हापूर, पुणे नगर, औरंगाबाद, बीड, परभणी या जिल्ह्यातील तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील.

शेतकरी मित्रांनो Hawaman Andaz Maharashtra बहुतांशी भागांमध्ये रब्बीची पेरणी पूर्णपणे झालेली आहे. तरी शेतकरी मित्रांनो पिकाची, स्वतःची काळजी घ्या तसेच जनावरांची सुद्धा काळजी घ्या कारण केव्हाही कुठेही गारपीट होऊ शकते.

Read  येत्या 24 तासात महाराष्ट्रातील या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता | IMD | Weather of Maharashtra
Share on:

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment

x