आपल्या जमिनीची शासकीय मोजणी कशी करायची? काय आहे पद्धती? जाणून घ्या

शेतकरी मित्रांनो आपल्या जवळ जमीन असेल, तर ती जमीन किती आहे हे फक्त आपल्याला कागदोपत्री माहिती असते. परंतु खरीखुरी आपली जमीन किती? हे आपण जेव्हा जमिनीची मोजणी करून घेवू तेव्हाच माहिती पडते.

म्हणून काही शेतकरी आपल्या जमिनीची खाजगी मोजणी करतात कारण ती लवकर होते आणि काही शेतकरी सरकारी मोजणी करून घेतात. ही करण्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु दोन्ही मोजणी मध्ये फारसा फरक नसतो. परंतु दोन्ही मोजणी मधील शासकीय मोजणी ही अतिशय महत्त्वाची असते आणि विश्वसनीय सुद्धा कारण सरकारी मूर्तीला कुणीही मान्य करेल.  परंतु खासगी मोजणीला कोणी मान्य करत नाही.

शासकीय मोजणी कशी करायची? या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला शेतीची जर मोजणी करायची असेल, ह्या करता एक विभाग असतो, त्याला भूमी अभिलेख विभाग म्हणतात. या विभागामार्फत कोणत्याही शेतीची शासकीय मोजणी केली जात असते. आपल्या तालुक्याच्या ठिकाणी भूमापन विभाग असतो किंवा भूमी अभिलेख विभागामध्ये जरी आपण गेले तरीसुद्धा आपली शेताची मोजणी अर्ज कोठे करायचा हे कळते.

Read  1 कोटी 50 लाख सातबारा उतारे झाले संगणकीकृत, बघा नवीन सातबारा कसा दिसेल

पूर्वी जमीन मोजणी करता आपल्याला कर्ज करावा लागत असे हा अर्ज, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्या नावे तुम्हाला करावा लागत असे. आता एक नवीन पद्धती आलेले आहेत ती आपण बघू

अर्ज करण्यासाठी आपल्याला https://emojni.mahabhumi.gov.in/emojni या वेबसाईटवर जाऊन आपल्याला नोंदणी करायची आहे. आपली वैयक्तिक माहिती असेल, जमिनीची माहिती असेल भरावी लागेल. हे झाल्यानंतर आपल्याला भुमिअभिलेख कार्यालयाकडून भूकरमापक मिळतो म्हणजेच ज्याला आपण सर्व्हर सुद्धा म्हणू शकतो हा व्यक्ती आपल्या जमिनीची मोजणी करणारा असतो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला एक रजिस्टर नंबर मिळतो.

त्यानंतर भूकर मापक 15 दिवसाच्या आत किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त दिवसात आपल्या शेतीच्या आजूबाजूच्या लोकांना नोटीस पाठवतो,ज्यास आपण हरकत घेतली आहे. आपल्यालाही नोटीस येते. म्हणजेच आपल्या जमिनीचा काही भाग ज्या शेतकऱ्याने बळकावला असेल त्याला आणि आपल्याला नोटिस येते.

Read  तुमच्या जमिनीची सरकारी किंमत जाणून घ्या Government Land Prices

जमिनीशी संलग्न असलेल्या सर्व शेतकऱ्यांना नोटीस येते ही नोटीस पंधरा दिवस अगोदरच येते. ज्यास आपण ॲडव्हान्स नोटीस सुद्धा म्हणू शकतो.

त्या नोटीसमध्ये लिहिलेले असते, आपल्या जमिनीची मोजणी आहे. त्याकरिता आपण ह्या तारखेस हजर रहावे किंवा उपस्थित रहावे जर कोणी हजर राहिला नाही तर, मोजणी थांबत नाही मोजणी शासकीय नियमानुसार होतेच. पाच लोकांच्या समक्ष शेतीची मोजणी होते.

जमिनीची मोजणी झाल्यानंतर तुमच्या शेतीच्या सीमा दाखवल्या जातात की, तुमची जमीन इथून इथपर्यंत आहे, कधीकधी सीमा ठरवण्यात मध्ये जर अडचण निर्माण झाली तर तुमचे मूळ कागदपत्र तपासून मग नंतर तुम्हाला सीमा ठरवून दिल्या जातात कि, तुमची जमीन कुठून कुठपर्यंत आहे म्हणून.

जो शेतकरी जमिनीची मोजणी करत असेल त्याच्याच बाजूने या मोजणीचा रिझल्ट लागेल असं नाही. कारण शासन तिथे पुरावे पाहतो आणि पुरावे पाहिल्यानंतर सिद्ध झाल्यानंतर जमीन कोणाची किती आहे, कोठून आहे ठरविल्या जाते. हे ठरवण्याचा अधिकार शासनाचा असतो. हा गैरसमज काढून टाका की, ज्याने फी भरलेली आहे, त्याच्याच बाजूने रिझल्ट लागेल म्हणून, असं होत नसतं.

Read  आता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही !

जुन्या परंपरागत पद्धतीने जर आपल्याला जमिनीची मोजणी करायची असेल तर, त्यासाठी सुद्धा प्रोसेस हीच आहे, फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज न करता तुम्हाला ऑफलाइन म्हणजेच भूमिअभिलेख कार्यालय मध्ये स्वतः जाऊन अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी काही कागदपत्र तिथे जोडावे लागतील ती कोणकोणती बघा.

अर्जामध्ये तुम्हाला स्वतःचे नाव, मोजणी का करायचे याचे कारण, जमिनीचा तपशील जमिनीची चतु:सीमा, मोजणीची फी तुम्हाला भरायची आहे आणि त्याची पावती अर्जासोबत सोडायची आहे. सातबारा, मोजणीचा प्रकार, वादाचा तपशील, जमिनीचा नकाशा आणि मोजणी चे कारण, ही सर्व माहिती आपल्याला अर्जासोबत पुरवायची आहे

One thought on “आपल्या जमिनीची शासकीय मोजणी कशी करायची? काय आहे पद्धती? जाणून घ्या

  1. Aamchya jaminila rasta naditun jato matra nadi madya purna atikarman karun fakta 7.8.fut jaga rahatetya mule 7mahine panyatun jav lagat pliz kay karave sanga.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x