group

Job for Age 60 Retired People | 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

मित्रांनो निवृत्त लोकांकरता खुशखबर आहे. पुन्हा एकदा नोकरीची चांगली संधी 60 वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांकरता चालून आलेली आहे. सरकारने या लोकांकरता एक खास पोर्टल तयार केले आहे या पोर्टल वर 1 ऑक्‍टोबरपासून 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक नोंदणी करू शकतात.

60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

पाहिले तर अशा प्रकारचे हे देशांमधील पहिलेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज employment exchange आहे. या पोर्टल ला SACRED (senior ibrl citizens for re-employment in dignity) हे पोर्टल सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाने सुरू केलेले आहे.

या पोर्टल वर 60 वर्षावरील जास्त वयाचे लोक नोंदणी करू शकतात आणि वर्चुअल मॅपिंग च्या आधारे अशा लोकांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध होईल मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम असे म्हणाले की हे एक्सचेंज एक इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म असेल. जेथे स्टेक होल्डर्स वर्षी वली एकमेकांना भेटू शकतील आणि पुढील रणनीती किंवा काम ठरवू शकतील. एम्प्लॉयर्सना एक्सचेंजवर आणण्याकरता मंत्रालयाने सीआयआय फिक्की आणि असोचेम आणि इतरही काही संस्थांना पत्र दिले आहे.

Read  Power Tiller Subsidy Maharashtra | पावर टिलर अनुदान योजना

कशी मिळेल नोकरीची संधी?

हे पोर्टल लाईव्ह झाल्यानंतर 60 वर्षावरील व्यक्ती येथे अर्ज करू शकतो याकरता त्यांचे शिक्षण, त्यांचा अनुभव, त्यांचे कौशल्य याची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच ते कोणत्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत. हेसुद्धा त्यांना सांगावे लागणार आहे. याशिवाय जॉब प्रोव्हायडरला कामाचा प्रकार आणि ते काम पूर्ण करण्याकरता किती लोकांची आवश्यकता असणार आहे, हे सांगावे लागेल. एवढेच नाही तर या कामांमध्ये जेष्ठ नागरिकांना मदत करण्याकरता स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.  तसेच एक्सचेंज म्हणजे नोकरीची हमी नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

Originally posted 2022-05-28 16:06:43.

group

1 thought on “Job for Age 60 Retired People | 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी”

Leave a Comment

x