Land Selling गुंठेवारीत जमिनीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध

Land Selling आता राज्यामध्ये जमिनीचे तुकडे पाडून त्या जमिनीची खरेदी विक्री करता येणार नाही. त्यावर सरकारने आता निर्बंध आणले आहेत. आता या निर्बंध अनुसार जमिनीचे गुंठ्यात तुकडे पाडून त्याची थेट खरेदी अथवा विक्री करता येणार नाही.  तुम्हाला जर जमिनीचे गुंठ्यामध्ये तुकडे पाडून त्याची खरेदी अथवा विक्री करायची असेल तर त्यासाठी सक्षम प्राधिकरण अथवा जिल्हाधिकार्‍यची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल.

समजा एखाद्या सर्वे नंबर मध्ये दोन एकर जमीन आहे त्या सर्वे नंबर मधील एक, दोन अथवा तीन गुंठे जागा तुम्ही विकत घेत असाल तर त्याची नोंदणी होणार नाही. त्याकरता तुम्हाला सर्वे नंबर चा लेआउट करून त्यात गुंठ्यांचे तुकडे पाडून त्याला जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

Read  Pith Girni Yojana Maharashtra 2022 | पीठ गिरणी योजना महाराष्ट्र २०२२ .

मगच अशा ले आऊट मधील गुंठाने विकत घेतलेल्या जमिनीच्या व्यवहारांची नोंद करता येणार आहे. जर यापूर्वी तुकड्यात जमिनीची खरेदी अथवा विक्री केली असेल तर अशा व्यवहारांसाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागणार आहे मात्र एखाद्या जमिनीचे भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित होऊन मोजणी नकाशा देण्यात आला असेल तर अशा तुकड्याने खरेदी विक्री केलेल्या जमिनीसाठी ही परवानगी आवश्यक राहणार नाही.

आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये जमिनीची किंमत प्रचंड वाढली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार सुद्धा वाढले आहेत. मुळात महसूल कायद्यात तुकडेबंदी लागू आहे, मात्र तरीही असे व्यवहार होऊन त्याची दस्त नोंदणी होत आहे त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक नियंत्रक विभागाने हे परिपत्रक जारी केलेला आहे.

Leave a Comment