PM Kisan FPO Yojana शेतकरी मित्रांनो अनेक अशा योजना शेतकऱ्यांकरता सरकारकडून राबविल जात असतात. मोदी सरकार कडून अशाच एका नवीन योजनेची तयारी चालू आहे त्यामध्ये शेतकरी गटास 15 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मदत व्हावी ह्या करता मोदी सरकारने पंतप्रधान शेतकरी योजना PM Kisan FPO Yojana या नावाने योजना सुरु केली आहे या कर्ज योजनेबाबत या लेखामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊया.
भारतामध्ये शेती हा व्यवसाय प्राचीन काळापासून आहे मोदी सरकारने शेतकऱ्यांना करता शेती आधारित व्यवसाय सुरू करण्या करता कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्याकरता शेतकऱ्यांना एकत्र येऊन 11 जणांचा गट किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. कंपनीला कृषी आधारीत उत्पन्न घेण्याच्या व्यवसाय करत आहे कर्ज मिळणार आहे.
या 15 लाखा मधुन शेतीसंबंधी खते बी-बियाणे उपकरणं असतील तसेच नव्या व्यवसायाकरता लागणारी आवश्यक उपकरणे शेतकरी खरेदी करू शकतात.
परंतु मित्रांनो योजना तयार आहे ही योजना सुरू होण्यासाठी आपल्याला थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे सरकार लवकरच या योजनेची घोषणा करणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शेतकरी PM Kisan FPO Yojana या करीता आपला अर्ज करू शकतील.