group

PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana 2021

केंद्र सरकारने PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana सुरु केली आहे. श्रमिक आणि ज्येष्ठ व्यक्तींना मोदी सरकारने आधार देऊन सर्वात मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने ज्येष्ठ व्यक्ती किंवा श्रम करणाऱ्या व्यक्ती दर महिन्याला तीन हजार रुपये मिळू शकतात अशा प्रकारची घोषणा केली आहे. या योजनेकरिता आतापर्यंत आपण बघतो की 45 लाख लोकांनी नोंदणी केली असून, केंद्र सरकारने अशा व्यक्तींकरता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे.

PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana

या योजनेमध्ये जे असंघटित क्षेत्र आहे, त्यामध्ये काम करणाऱ्या श्रमिकांना वयाची साठ वर्ष जर पूर्ण केली असतील, तर दरमहा तीन हजार रुपये किमान पेन्शन दिले जाईल. ही योजना सरकारने 2018-19 मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना म्हणजेच pm-sym या नावाने सुरू केली आहे.

Read  Wine sales in Supermarket | आता सुपर मार्केट मध्ये मिळणार वाईन

4 मार्च 2021 पर्यंत सुमारे 44 लाख 90 हजार सैनिकांनी आपली नोंदणी केलेली दिसते. या योजनेमध्ये 18 ते 40 वर्षाच्या समूहाचे असे श्रमिक सहभागी होऊ शकतात की ज्यांचे उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

किती मिळेल पेन्शन?

प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेअंतर्गत पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये महिना गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेत अठरा वर्षाच्या व्यक्तींना महिना पंचावन्न रुपये आणि तीस वर्षाची जर व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीला शंभर रुपये तर 40 वर्षे वय असलेल्या व्यक्तीला दोनशे रुपये महिना भरावे लागेल.

[su_button target=”blank” background=”#cbef2d” color=”#141ca1″ size=”5″ radius=”round” icon_color=”#171819″ text_shadow=”4px 3px 3px #000000″]shetkaree[/su_button]

जर एखाद्या श्रमीकाने 18 व्या वर्षी PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana योजनेमध्ये जर आपली नोंदणी केली असेल तर, त्याला एका वर्षाला केवळ 660 रुपये जमा करावे लागतील आणि ह्याचे 60 वर्ष वयापर्यंत 27720 रु गुतवावे लागणार आहेत. श्रमीकाला 40 वर्षापर्यंत पैसे गुंतवावे लागतील आणि त्यानंतर 60 वर्ष झाल्यानंतर त्यास दरमहा तीन हजार रुपये मिळतील.

Read  10th ,12th Exam New Update 2023 | १० वि १२ वि नवीन अपडेट २०२३.

एलआयसीLIC च्या माध्यमातून ही योजना चालवली जात असून आपल्याला पेन्शन सुद्धा LIC कडून मिळेल.

नोंदणी कशी करायची?

प्रथम आपल्याला प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेंशन PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana योजनेत आपली नोंदणी जर करायची असेल तर बँक पासबुक, आधार कार्ड आपल्याला आपल्या सीएससी CSC सेंटरला जावे लागणार आहे.

खाते सुरू केल्यानंतर श्रमिकांना श्रमयोगी कार्ड दिले जाणार आहेत. PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana मार्फत आपल्याला पेन्शन मिळणार आहे. आपले कुठलेही प्रश्न असतील तर आपण माहितीकरता 1800-267-6888 या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता.

Originally posted 2022-07-07 10:01:36.

Categories GR
group

1 thought on “PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana 2021”

Leave a Comment

x