Pradhan Mantri Ujjwala Yojana मित्रांनो तुम्हाला जर मोफत घरगुती गॅस कनेक्शन घ्यायचे असेल, तर तुमच्याकरिता आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत Pradhan Mantri Ujjwala Yojana मोफत घरगुती गॅस कनेक्शन देत असते. बिझनेस स्टॅंडर्ड च्या माहितीनुसार या जून महिन्यात PMUY चा पुढील टप्पा सुरू होत आहे. माहिती अशी मिळत आहे की, सध्याच्या योजनेचा हा टप्पा आधीच्या टप्प्याप्रमाणेच असेल.
पी एम यु वाय PMUY च्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पंतप्रधान उज्वला योजनेच्या पुढील टप्प्याच्या आराखड्याला अंतिम स्वरूप सुद्धा दिलेले आहे, आणि त्यामुळे लवकरच हा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्र्यांची 1 फेब्रुवारीला केली होती घोषणा
अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला मोफत घरगुती एलपीजी गॅस योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली होती अर्थमंत्र्यांनी असे म्हटले आहे की आणखी एक कोटी लाभार्थ्यांना या योजनेच्या अखत्यारीत आणले जाईल किंवा त्यांना लाभ मिळेल. तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर खालील माहिती जरूर वाचा.
कोणाला मिळू शकेल लाभ?
प्रधानमंत्री उज्वला योजना Pradhan Mantri Ujjwala Yojana अंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील येणाऱ्या कुटुंबांना घरगुती गॅस कनेक्शन देत असते हे कनेक्शन कुटुंबातील महिलांच्या नावे देण्यात येते ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे ही अधिकची मदत मिळालेली आहे.
कसा करायचा ऑनलाईन अर्ज?
तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी प्रधानमंत्री उज्वला योजने Pradhan Mantri Ujjwala Yojana च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच pmujjwalyojana.com यावर भेट द्यावी लागेल या ठिकाणी तुम्हाला होम पेज वरून एलपीजी गॅस कनेक्शन चा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
डाउनलोड फॉर्म वर क्लिक केल्यानंतर या योजनेचा फॉर्म तेथे ओपन होईल.
हा फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी email ID, नाव, फोन नंबर, कॅपच्या कोड इत्यादी भरावे लागेल त्यानंतर तुमच्या फोन नंबर वर ओटीपी येईल म्हणजे तुम्हाला ओटीपी OTP जनरेट करण्यासाठी देण्यात आलेल्या बटनावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्ही फॉर्म डाऊनलोड करून घ्या. हा फॉर्म तुम्ही तुमच्या जवळच्या एलपीजी एजन्सी ला जाऊन द्या.
या फॉर्मसोबत तुम्हाला काही कागदपत्र सुद्धा द्यावे लागतील जसे की तुमचे आधार कार्ड Adhaar Card, तुमचा पत्ता Address, तुमचा फोटो Photo.
फ्रॉम आणि कागदपत्र व्हेरीफिकेशन Documents Verification झाल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येईल.
तुम्हाला महाराष्ट्रामधील कलाकारांची, संस्कृतीची, खेळ जगत, राजकारण, इतिहास, करमणुकीची माहिती वाचायची असेल तर आमच्या बातमी मराठी Batmi Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
राहणार थोरांदळे
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे