Ration Card Aadhar link Update | राशन कार्ड आधार कार्डला लिंक कसे करावे?

Ration Card Aadhar link Update राशन कार्ड धारकांना शासनाकडून धान्याचा लाभ देण्यात येत असतो. लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्याकरता ई पास मशीनवर लाभार्थ्यांचे आधार अधिप्रमाणित करून धान्य वितरित करण्याची सुविधा पुरविण्यात आलेले आहे. त्याकरता शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सीडीग पूर्ण असणे आवश्यक आहे. जर आता धान्याची उचल केली नाही तर शिधापत्रिका रद्द होणार आहेत.

दहावी किंवा बारावी ओरिजनल सर्टिफिकेट दोन मिनिटांमध्ये डाऊनलोड करा

ज्या शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आधार सीडींग करून घेतलेले नसेल अशा सदस्यांची नावे ऑनलाइन आरसीएमएस प्रणाली मधून काढून टाकण्यात येणार आहेत.  तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या धान्य मागील अनेक वर्षांपासून उचल केलेले नाही किंवा आधार कार्ड संबंधित नोंदी अद्ययावत केलेल्या नसतील तर अशा एकूण 14611 शिधापत्रिका आर सी एम एस प्रणाली मधून वगळण्यात आल्या आहेत.

Read  Talathi Bharti Timetable 2023 | तलाठीभरती वेळापत्रक २०२३ .

म्हणून आता शिधापत्रिकाधारकांनी त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य महिन्याला घ्यावे. त्याचप्रमाणे शिधापत्रिके मधील सर्व व्यक्तींची नावे आधार सीडींग करून घ्यावे. यापुढे आता शिधापत्रिकाधारकांनी आधार सीडीग केलेले नसेल आणि सहा महिन्यापर्यंत धान्य उचल केले नसेल, अशा शिधापत्रिकाधारकांची नावे वगळण्यात येणार आहेत,  अशी माहिती पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधाल?

 

Leave a Comment