RTO Challan Driving License | ड्रायव्हिंग लायसन्स ठेवायची गरज नाही?

RTO Challan Driving License आता ड्रायव्हिंग करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… ड्रायव्हिंग लायसन्स ठेवायची गरज नाही….. बिनधास्त कार-बाइक चालवा…. ट्राफिक पोलीस तुमचे चलन कापणार नाही……

आपल्याला बऱ्याचदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा कोणत्याही गावाला ऑफिसला जाण्यासाठी आपण कार-बाइकचा उपयोग करत असतो परंतु घाई घाईमध्ये आपण बऱ्याच वेळा लायसन्स विसरून जातो मग ट्राफिक पोलिसांकडून आपली चेकिंग होते तेव्हा ट्राफिक पोलीस आपले चलन कापतो. एवढेच नाही, तर आपल्या कडे गाडीची इतर कागदपत्रे नसतील तर चलनाची रक्कमही वाढत जाते.

आता आपल्यासोबत असे घडू नये यासाठी आम्ही एका अशा अ‍ॅपची माहिती देणार आहोत, जे आपला चलनापासून बचाव करेल. तसेच आपल्याला गाडीची इतर कागदपत्रेही ठेवावी लागणार नाहीत. डिजी लॉकर अ‍ॅप डिजीलॉकर किंवा डिजिटल लॉकरच्या मदतीने आपण व्हर्च्युअल डॉक्युमेंट्सचा सहजपणे वापर करू शकता. हे एक सरकारी अ‍ॅप असून, आपण यावर आपल्या वाहनाची कागदपत्रे सेव्ह केल्यास, चेकिंग दरम्यान आपल्या वाहनाचे चलन कापले जाणार नाही. विशेष म्हणजे हे अ‍ॅप वापरासाठी अत्यंत सोपे आहे.

Read  Pik Karj Yojana Vyaj Mafi पिक कर्ज योजना व्याज माफी शासन निर्णय

तसेच सध्या बरेच लोक या अ‍ॅपचा वापरही करत आहेत.  हे एक डिजिटल दस्तऐवज वॉलेट आहे. आपण येथे आपली कागदपत्रे जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, व्होटर आयडी, पॉलिसी डॉक्युमेंट आदी स्टोअर करू शकता. यासाठी आपल्याला एक स्वतंत्र क्लाउड स्टोरेज स्पेसदेखील मिळेल, जो तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेला असेल.

या चार सोप्या पायऱ्यांचा वापर करून आपण ऑनलाइन डिजिलॉकर ओपन करू शकता.

1)  डिजिलॉकर वेबसाइटवर जा. आपल्याला डिजिलॉकर digilocker.gov.in वर अ‍ॅक्सेस करता येईल. आपण प्ले/अ‍ॅप स्टोअरवरूनही आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमाने अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता. याशिवाय, आपण डिजिलॉकर वेबसाइटवर जाऊन डिजिटल लॉकर खाते तयार करण्यासाठी आधार नंबरचा उपयोग करू शकता. यासाठी आपला फोन नंबर आधारशी लिंक असायला हवा.

Read  BPL Ration Card पिवळे राशन कार्ड कोणाला मिळेल?

2)  ‘साइन अप’वर क्लिक करा. आपले संपूर्ण नाव, जन्म तारीख, मोबाइल नंबर टाका जो आधारसी लिंक आहे. एक पासवर्ड तयार करा आणि एक ईमेल आयडी टाका.

3) आपला आधार क्रमांक टाका. यानंतर आपल्याला दोन पर्याय येतील, एक असेल वन टाइम पासवर्ड (ओटीपी) आणि दुसरा असले फिंगरप्रिंट, पुढे जाण्यासाठी आपण कुठलाही पर्याय निवडू शकता.

4) वापरकर्त्याचा आयडी : एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला ‘वापरकर्त्याचे नाव’ आणि ‘पासवर्ड’ तयार करावा लागेल. हे टाकल्यानंतर, साइन-अप बटनवर क्लिक करा. खाते यशस्वीपणे तयार झाल्यानंतर, अॅप्लिकेशन डिजिलॉकरची ‘डॅशबोर्ड’ स्क्रीन दाखवेल.

 

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

x