वृतसंस्था
यवतमाळ : दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी शाळास्तरावर सुरू झाली आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे नियोजन अमरावती विभागीय परीक्षा मंडळाने केले आहे.
परीक्षेदरम्यान केंद्रावर पाच पेक्षा जास्त कॉपी आढळल्यास केंद्रच रद्द करण्याचा इशारा परीक्षा मंडळाच्या बैठकीत मुख्याध्यापकांना देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात महत्त्वाची परीक्षा म्हणून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेकडे बघितले जाते. जानेवारी महिन्याचा पंधरवडा तोंडवार येताच अमरावती विभागीय परीक्षा मंडळ परीक्षेच्या संदर्भाने नियोजन सुरू केले आले आहे. मंडळाच्या सहायक सचिव साळुंके, अधीक्षक सुरेश पाचंगे, अधीक्षक नंदकिशोर साखरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत, शिक्षण उपनिरीक्षक योगेश डाफ यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात पुसद व यवतमाळ येथे दोन सत्रात ही बैठक झाली.