भारत सरकार कडून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते, त्यामध्ये वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ , भूसखलन , पावसाची अनियमितता , पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी मुळे होणारे नुसकान अशा कितीतरी कारणांमुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाबद्दल कायमच धोका असतो शेतकरी हा आपल्या शेती पिकावर अवलंबून असतो त्यामुळे त्यांचे शेतीत झालेले नुकसान हे शेतकर्याच्या सहनशीलते पलीकडे असते त्यामुळे शासनाने आता शेतकऱ्यांना या संकटातून थोडाफार दिलासा म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार या दोन्ही शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे . सततच्या अपुरा पाऊस, हवामानातील बदल, प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान हे नैसर्गिक आपत्ती असल्याने त्याला आधार म्हणून विमा कंपनी आपली भूमिका बजावेल मात्र केवळ कंपनीने ठरवून दिलेले मुख्य पीक व लागवड क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमासंरक्षण देय राहील . मात्र विमा कंपनीने ठरवून दिलेल्या पिकाला विमा लागू राहील मुख्य पीक निश्चित करताना जिल्हा तालुका स्तरावरील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी किमान 25 टक्के पेरणी क्षेत्र या मुख्य पिकाखाली असणे आवश्यक आहे .
Sneha Tomar Age, Biography, Wiki,Instagram,Bf,Family,Networth
कारण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा संरक्षित प्रकल्पाच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत दिली जाते व सदर क्षेत्राचे विमा संरक्षण हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्यानंतर संपुष्टात येईल. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पाहता पंधरा दिवस आधीपर्यंत पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादी बाबींमुळे कंपनीने ठरवून दिलेले मुख्य पिकाच्या क्षेत्रात सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा कमी असेल तर सर्व कंपनीने ठरवून दिलेले क्षेत्र हे विमा संरक्षण व आर्थिक मदतीसाठी पात्र राहील .तसेच अपेक्षित नुसकान भरपाई रकमेच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत असेल.
आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यात येईल जिल्हास्तरीय समिती नियंत्रण समिती व विमा कंपनीच्या अधिकारी तसेच राज्य शासनाचे अधिकारी यांची संयुक्त समिती गठीत केलेली असेल आणि ही समिती पिक नुसकान सर्वेक्षणा करिता कार्यवाही करेल जर प्रतिकूल परिस्थिती ही सर्वसामान्य पीक काढणीच्या वेळेच्या 15 दिवस अगोदर आली तर तरतूद लागू राहणार नाही व नुसकान भरपाई दिली जाणार नाही.
या पिकांची काढणी केल्यानंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा पिकांना कापणीनंतर सुकवण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या कंपनीने निश्चित केलेले पिकाची काढणी नंतर दोन आठवड्याच्या आत गारपीट चक्रीवादळ अवकाळी पाऊस व अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे नुस्कान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येईल या तरतुदी अंतर्गत अवकाळी पाऊस म्हणजे त्या जिल्ह्याचे त्या महिन्याचे दीर्घकालीन पावसाचे सरासरी 40 टक्के अधिक पाऊस व वैयक्तिक स्तरावर पंचनामे मध्ये झालेले नुसकान इत्यादी व पिकांची नोंद असलेल्या विमा हप्त्याचा पुरावा विमा कंपनी सादर करणे आवश्यक आहे.
जर बाधित क्षेत्र हे कंपनीने ठरवून दिलेल्या विमा संरक्षित क्षेत्राच्या 25 टक्केपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर पात्र शेतकऱ्यांची नुस्कान ठरविण्यात येईल जर नुस्कान 25 टक्के पेक्षा जास्त असेल तर कंपनी ठरवून दिलेल्या क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काढणीपश्चात नुसकान भरपाई पात्र ठरतील . तसेच संयुक्त समितीने केलेल्या नमुना सर्वेक्षणाच्या आधी विमा कंपनीमार्फत नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येईल ठीक नुकसानीचे सर्वेक्षण संयुक्त समिती मार्फत करण्यात येईल
यात विमा कंपनीचा समावेश असेल. तसेच हंगामाच्या शेवटी प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे निश्चित होणारे नुकसान भरपाई तर या तरतुदी अंतर्गत मिळालेल्या नुसकान भरपाई पेक्षा जास्त असेल तर हंगामाच्या शेवटी मधील सरकारातील रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येईल येईल.
तसेच या तरतुदी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र हे पडलेल्या पावसामुळे पाण्याची जेपातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर तसेच पुराचे पाणी शेतात शिरून राहिल्यामुळे पिकाचे झालेले नुसकान गारपीट भूसखलन ढगफुटी अथवा नैसर्गिक व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान यासाठी वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल.
विमा कंपनीकडून आर्थिक मदत जास्तीत जास्त संबंधित पिकाच्या क्षेत्राच्या विमा संरक्षित रकमेवरील राहील विमासंरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित रुग्ण बाधित क्षेत्र बाबत घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी कृषी विभाग महसूल विभाग किंवा टोल फ्री कंपनीचा टोल फ्री क्रमांकावर द्यावी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक आहे त्यासोबत कागदपत्रांमध्ये सातबारा गोपिका ची नोंद असलेल्या तसेच विमा भरल्याचा पुरावा विमा विमा कंपनी सादर करणे बंधनकारक आहे
विमा कंपनीने ठरवून दिलेल्या विमा संरक्षित क्षेत्राचे 25 टक्केपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर मात्र शेतकरी नुकसान भरपाई पात्र आहेत नुकसानीचे सर्वेक्षण संयुक्त समिती मार्फत करण्यात येईल.
त्यामध्ये तालुकास्तरावरील कृषी अधिकारी आणि संबंधित विमा कंपनीचा पर्यवेक्षक यांचा समावेश असेल हंगामाच्या शेवटी प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे निश्चित होणारी नुसकान भरपाई या तरतुदी अंतर्गत मिळालेला नुसकान भरपाई पेक्षा जास्त असेल तर हंगामाच्या शेवटी वर्गातील रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येईल
विमा संरक्षित क्षेत्रात येणारे खरीप हंगामातील पीक – ज्वारी भात बाजरी नाचरी मुळी तूर मका भुईमूग सूर्यफूल सोयाबीन कापूस कांदा भात इत्यादी
विमा संरक्षित क्षेत्रात येणारे रब्बी हंगामातील पीक – गहू बागायती रब्बी ज्वारी हरभरा उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग रब्बी कांदा इत्यादी.
जळगाव – ज्वारी 480 रुपये, बाजरी 400रुपये भुईमूग 640 रुपये, उडीद व मूग 400 रु, सोयाबीन 720 रुपये , तुर 500 रुपये, मका 524 रुपये.
सोलापूर – ज्वारी 460 रुपये, बाजरी360 रुपये , सोयाबीन 680 रुपये, भुईमूग 350 रुपये, कापूस 1100 रुपये, कांदा 2750 , उडीद 380, मूग 360 रुपये, तुर 550 रुपये.
पुणे – सोयाबीन 900 रुपये, भुईमूग 700 रुपये, उडीद मूग 400 रुपये, कांदा 3250 रुपये, ज्वारी 500 रुपये, भात 910 रुपये.
सातारा – सोयाबीन 520 रुपये, कांदा 1800 रुपये, नाचणी320 रुपये, बाजरी 280 रुपये , भात 660 रुपये.
अहमदनगर – कापूस 2000 रुपये, भुईमूग 600 रुपये, सोयाबीन 750 रुपये, उडीद /मूग 400 रुपये, तुर 700 रुपये, मका 600 रुपये, कांदा 3250 रुपये, बाजरी 440 रुपये .
नंदुरबार – भात 750 रुपये, कापूस 2250 रुपये, ज्वारी 500 रुपये , बाजरी 440 रुपये, भुईमूग 700 रुपये, सोयाबीन 900 रुपये, उडीद/ मूग 400 रुपये, मका – 600 रुपये, तुर 700 रु.
यवतमाळ – कापूस 2000 रुपये, ज्वारी 500 रुपये, सोयाबीन 800 रुपये, उडीद/ मूग 400 रुपये, तुर 700 रुपये.
नाशिक – सोयाबीन 900 रुपये, ज्वारी 500 रुपये, बाजरी 440 रुपये, कापूस 2250 रुपये, मका 600 रुपये, कांदा 3250 रुपये, उडीद400 रुपये, भुईमूग 700 रुपये, नाचणी 250 रुपये, भात 900 रुपये.
नागपूर – भात 835 रुपये, बाजरी 440 रुपये, तुर 700 रुपये, भुईमूग 700 रुपये, सोयाबीन 900 रुपये, उडीद मूग 400 रुपये.
चंद्रपूर – ज्वारी 500 रुपये, सोयाबीन 900 रुपये, उडीद मूग 400 रुपये, कापूस 2250 रुपये, तुर 700 रुपये, भात 850 रुपये.
गडचिरोली – सोयाबीन 690 रुपये, भात 625 रुपये, कापूस 1787 रुपये.
गोंदिया – भात 760 रुपये .
भंडारा – कापूस 2250 रुपये, भात 760 रुपये, सोयाबीन 550 रुपये. डा
नांदेड – कापूस 2250 रुपये, सोयाबीन 900 रुपये, मका 600 रुपये, उडीद /मूग 400 रुपये , तुर 700 रुपये, ज्वारी 500 रुपये.
बुलढाणा – कापूस 2250 रुपये, सोयाबीन 900 रुपये, मका 600 रुपये, तुर 700 रुपये, ज्वारी 500 रुपये, उडीद मूग 400 रुपये.
हिंगोली – सोयाबीन 900 रुपये , कापूस 2250 रुपये, मका 600 रुपये ,तूर 700 रुपये ,उडीद/मुग 400 रुपये, ज्वारी 500 रुपये .
परभणी – ज्वारी 500 रुपये, बाजरी 440 रुपये, सोयाबीन 900 रुपये, तुर 700 रुपये , उडीद/ मूग 400 रुपये.
अकोला – कापूस 2150 रुपये, तुर 630 रुपये, सोयाबीन 900 रुपये, ज्वारी 500 रुपये, उडीद/ मूग 380 रुपये.
वाशीम – सोयाबीन 900 रुपये, ज्वारी 500 रुपये, तुर 630 रुपये, उडीद/मूग380 रुपये, कापूस 2150 रुपये.
अमरावती – भात 768 रुपये, सोयाबीन 800 रुपये, उडीद/मूग 400 रुपये, तुर 640 रुपये, ज्वारी 500 रुपये.
वर्धा – कापूस 2250 रुपये , तुर 700 रुपये, उडीद/ मूग 400 रुपये, ज्वारी 500 रुपये, भुईमूग 700 रुपये, सोयाबीन 900 रुपये.
सांगली – भात 600 रुपये, ज्वारी 500 रुपये, बाजरी 440 रुपये, सोयाबीन 800 रुपये, भुईमूग 600 रुपये ,कापूस 1750 रुपये , उडीद/ मूग360 रुपये, तूर 500 रुपये, मका 600 रुपये.
कोल्हापूर – भात 910 रुपये, ज्वारी 500 रुपये, नाचणी 370 रुपये, सोयाबीन 900 रुपये, भुईमूग 700 रुपये.
औरंगाबाद – मका 600 रुपये, कांदा 3250 रुपये, कापूस 2250 रुपये, ज्वारी 500 रुपये, बाजरी 440 रुपये, सोयाबीन 900 रुपये, तूर 700 रुपये, उडीद /मूग 700 रुपये.
उस्मानाबाद – कापूस 2250 रुपये, ज्वारी 500 रुपये, सोयाबीन 900 रुपये, बाजरी 440 रुपये ,तुर 700 रुपये, उ