Pik Vima 2021 पीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

पिक विमा बाबत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे, आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची वार्ता सुद्धा.  पिक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे आपण बघूया.

Pik Vima पीक विमा

मित्रांनो या वर्षी शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आणि त्यामुळेच त्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता ते शेतकरी विमा कंपन्यांकडे आस लावून बसले होते. सरळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम जमा करावी अशा प्रकारचे आदेश सरकारने दिले होते आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा Pik Vima ची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती ज्या काही प्राप्त तक्रारी आहेत, त्या तक्रारी तातडीने निकाली काढाव्या अशाप्रकारे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी निर्देश दिले होते आणि त्या अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजने मध्ये सहभागी विमा कंपन्यांकडून कशाप्रकारे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हळूहळू पीक विम्याची रक्कम टाकण्यास सुरुवात झाली आहे.

Read  Gramsevak Bharti Maharashtra 2023 | ग्रामसेवक भरती महाराष्ट्र २०२३ .

शेतीतील पिकाचे नुकसान झाले परंतु पीक विमा कंपन्या या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे फारच हळूहळू करत आहेत. त्यामुळे आता पिक विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा वेग वाढवावा अशाप्रकारे निर्देश देण्यात आलेले आहेत.

प्रधानमंत्री पीक पीक विमा योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पीक विम्याची रक्कम आठ दिवसांमध्ये जमा होणार होती तर सहाव्या दिवशी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्हा करता 64 कोटी 59 लाख रुपये पिक विमा मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम जमा झाल्याचे मेसेज सुद्धा आलेले आहेत. आपणही आपल्या पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा झाली किंवा नाही हे बघून घ्या.

Leave a Comment