आता या रब्बी पिकांकरिता शेतकऱ्यांना शेतमाल भाव संरक्षित करता येणार- NCDEX

शेतकरी मित्रांनो आता पेरनीलाचा शेतमालाचा दर आपल्याला संरक्षित करता येणार आहे NCDEX ने मोहरी व हरभरा भावातील भविष्यात होणाऱ्या किंमतीतील घसरणीची जोखीम टाळण्याकरिता put option शेतकरी वर्ग व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्याकरिता उपलब्ध करून दिले आले.

कशी करता येणार मालाची सुरक्षित किंमत?

शेतकरी यामध्ये प्रीमियम भरून पिकाची किंमत सुरक्षित करू शकेल. ज्यावेळी option settlement च्या वेळेस दर कमी असतात तरीही ठरलेली किंमत शेतकऱ्यांना मिळेल. आणि याउलट मालाचा दर जास्त असेल तर शेतकरी आपला माल खुल्या बाजारात विकू शकेल तशी त्यास मुभा असेल अशी माहित संचालक विजय कुमार एन सी डी इ एक्स यांनी दिली.

Read  Hami Bhav खरिप हंगाम 2021 चे हमीभाव जाहीर

कोणता पर्याय आहे?

ऑप्शन(पर्याय) च्या माध्यमातून शेतकर्यांना पेरणी करते वेळेस आपल्या शेतातील मालाचा भाव बांधून घेता याणार आहे. फक्त त्यावेळी शेतकऱ्यास प्रीमियम भाराने आवश्यक आहे. हे ऑप्शन सध्या रब्बी पिक मोहरी व हरभरा या दोन पिकांसाठी देण्यात आले आहे.

कारण या दोन्ही पिकाची लागवड सध्या सुरु आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा शेतकरी एका विशिष्ट काळाकरिता प्रीमियम भरून किंमत सुरक्षित केल्यानंतर Option Settlement च्या काळात बाजारात कमी किंमत असो आपला माल सुरक्षित केलेल्या किंमतीत विकता येणार आहे.

कशाचे नसणार बंधन?

दुसरी स्थिती अशी निर्माण होऊ शकते कि आपल्या सुरक्षित केलेल्या दरापेक्षा भाव जास्त असल्यास शेतकऱ्यांना option पूर्ण करण्याचे बंधन नसेल. शेतकरी याही बाजारात आपला माल विकू शकतो. आणि हो शेतकऱ्यांचे अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले तर शेतकरी हा व्यवहार पूर्ण करण्यास बांधील नसणार आहे.

Read  धान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रु बोनस-महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

तर अशाप्रकारे मित्रांनो आता NCDEX ने शेतकरी राजास आपल्या मालाच्या उत्पादन खर्चानुसार दर ठरविण्यास एक मोठे ठिकाण उपलब्ध करून दिले आहे. तसे पाहले तर 2003 पासून शेती मालाच्या वायद्यांचे व्यवहार NCDEX वर होत आहेत आता option ची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना याचा काय लाभ होईल?

1 व्यवहार करण्याअगोदर प्रीमियम कळविला जाईल.
2 सध्या दोन पिके म्हणजे मोहरी व हरभरा पिकांचे दर संरक्षित करता येतील.
3 शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या यामध्ये व्यवहार करू शकणार आहे.
4 पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यावर व्यवहाराचे बंधन नाही.
5 सुरक्षित दरापेक्षा भाजारातील दर जास्त असल्यास शेतकरी वर्गास खुल्या बाजारात आपला माल विकता येणार आहे.
6 बाजारातील दर घसरले तरी शेतकऱ्यास संरक्षित दर मिळणार आहे.

Leave a Comment