कुक्कुट पालन कोंबडी पालन व्यवसाय अनुदान कर्ज योजना मार्गदर्शन माहिती 2021

कुक्कुट पालन कोंबडी पालन व्यवसाय अनुदान कर्ज योजना मार्गदर्शन माहिती 2021 शेळीपालन व्यवसायासारखा अतिशय नफ्याचा व्यवसाय आहे. आजच्या तरुणांनी अगदी शहरी भागात देखील पुढे येऊन हा व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही. गावाला जाण्याची तयारी असलेल्या व्हीआरएस घेतलेले यांनी अथवा रिटायर्ड झालेल्यांनी सुद्धा हा व्यवसाय करण्यास हरकत नाही.

कुक्कुट (पालन कोंबडी) पालन व्यवसाय अनुदान कर्ज योजना मार्गदर्शन माहिती 2021

कुक्कुटपालन कोंबडी पालन

जगात बर्‍याच ठिकाणी जोडधंदा म्हणून शेतकरी कोंबड्या पाळतात व स्थानिक बाजारात अंडी व पिल्ले यांची विक्री करतात. कुक्कुटपालन हा व्यवसाय शेती पूरक असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडणारा आहे. तसेच अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिक संस्था अस्तित्वात असलेल्या असून त्यांच्यामार्फत बऱ्याच दूरवर अंडी व मासे यांचे वितरण करण्यात येते.

प्रगत देशात अंड्यांची व माशांचे उत्पादन करण्याचे तंत्र मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यात आले असून ही उत्पादने वेगवेगळेच करण्याची प्रथा पडत चालली आहे. पाश्‍चात्त्य देशात कुक्कुटपालन या संज्ञेचा कोंबड्यांच्या बरोबर टर्की, बदके, हंस इत्यादी पक्षी पाडणे असा अर्थ प्रचलित आहे.

पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कुकुट वंशाचे पूर्व, मध्य व पूर्व आणि उत्तर भारतात हिमालयाच्या उतरणीचा प्रदेश, आसाम, ब्रह्मदेश, श्रीलंका, जावा व सुमित्रा या प्रदेशात असणाऱ्या जंगले अवस्थेतील कुक्कुट असे मानतात. कुक्कुटा संबंधीच्या नोंदीमध्ये सर्वात जुनी नोंद ही भारतातच आहे. चीनमधील एका विश्वकोशांमध्ये हा पश्‍चिमेकडील पक्षी आहे, असा उल्लेख आहे आणि भारत हेच त्याचे मूलस्थान असावे असेच चिनी लोकही म्हणतात. ह्याच सुमारास इजिप्तमध्ये मातीच्या भांड्यामध्ये कृत्रिम पद्धतीने अनुभवण्याचे उल्लेख देखील आपल्याला दिसून येतात. गंगेच्या काठावर आर्य पोहोचले तेव्हाचा कुकुट संबंधीचा उल्लेख आयुर्वेदातही आहे.

उत्पादनविषयक तत्त्वे :

आनुवंशिकीतील सिद्धतत्त्वांचा आधार घेऊन चांगले नर व माद्या वापरून अंड्यांसाठी व मांसासाठी वर्णन केलेल्या जाती तयार करण्यात आल्या आहेत. अंडी घालण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या विशिष्ट पेट्यांचा शोध लागल्यापासून नक्की कोणती कोंबडी किती अंडी घालते हे समजू लागले. कोंबडी या पेटीत जाऊन अंडी घालते पण माणसाने पेटीचे दार उघडल्याशिवाय तिला बाहेर येता येत नाही. ती आत गेल्यावर मात्र दार आपोआप बंद होते.

Read  Roof top solar anudan Yojana application for Maharashtra | घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याकरता केंद्र सरकारकडून 40% अनुदान

यामुळे एका वर्षात घातलेल्या अंड्यांची संख्या, त्यांचा आकार, कवचाची जाडी, ती उबवली असताना पिलांचे बाहेर पडण्याचे प्रमाण गुणांची नोंद होऊ शकली. अशा नोंदींचा उपयोग करून नर व माद्या निवडून त्यांपासून प्रजनन करून आनुवंशिकीतील अंतःजनन, संकर इ. सिद्धांतांचा अवलंब करून संख्येने जास्त, आकाराने मोठी अशी अंडी देणार्‍या त्याचप्रमाणे थोड्या दिवसांत कमीत कमी खाद्याचे जास्तीत जास्त मांसात रूपांतर करणाऱ्या अशा कोंबड्यांच्या जाती निर्माण करण्यात आल्या.

एका नराचा दहा माद्यांशी संबंध येत असल्यामुळे नर निवडताना तर त्याच्या वंशावळीबद्दल विशेषच काळजी घेतली जाते. इंग्लंड, अमेरिका, डेन्मार्क, इस्राएल व इतर यूरोपीय देशांमध्ये अशा अनेक जाती निर्माण करण्यात आल्या आहेत. एखादी जात अस्तित्वात आली म्हणजे त्या जातीच्या अस्सल कोंबड्या आणि कोंबडे यांचाच संयोग करून त्या जातीची नसल जपतात. अशा एकाच जातीच्या वंशवृद्धीसाठी मोठमोठ्या वाड्या, खुराडी त्या देशांत तयार करण्यात आलेल्या आहेत.

अंडी उबवणे :

कोंबडी (कुक्कुट (पालन कोंबडी) पालन व्यवसाय अनुदान कर्ज योजना मार्गदर्शन माहिती 2021 ) अंड्यांवर बसून 10 ते 15 अंडी, पंख अर्धवट उघडून त्यांना आपल्या शरीराच्या उबेने उष्णता देऊन उबविते. अंडी उबविण्याकरिता ती काळोखाची व एकांताची जागा जास्त पसंत करते. निसर्गतः अंडी घालण्यासाठीही ती अशीच जागा पसंत करते. अशा रीतीने अंडी उबविण्यासाठी बसण्याला ‘खुडूक बसणे’ म्हणतात. एकवीस दिवसांनंतर पिले बाहेर पडतात, अर्थातच ह्या काळात ती अंडी घालीत नाही. त्यामुळे वर्षाकाठी घातलेल्या अंड्यांची संख्या कमी होते.

खूडूक बसणे हा आनुवंशिक गुण असून तो अवगुण समजला जातो. सुधारलेल्या जातीच्या कोंबड्या खुडूक बसत नाहीत. कोंबडीपालनाला व्यवसायाचे स्वरूप येऊ लागले. तेव्हा एकाच वेळी शेकडो अंडी उबवण्याची गरज पडू लागली व त्याकरिता कृत्रिम पद्धतीने अंडी उबविण्याची जरुरी भासू लागली.

वर्गीकरण :

कोंबड्यांच्या शंभरहून अधिक जाती अस्तित्वात आहे. मूलस्थान किंवा प्रदेश बाहेरून रंग आकार आणि वजन यावर भर देऊन प्रथम जाती ठरविण्यात आल्या. जातितील साधर्म्यावरून त्यांची उपयोगा -च्या दृष्टीने पुन्हा वर्गवारी करण्यात आली आहे. हे वर्गीकरण ढोबळमानाने करण्यात आलेली आहे .

Read  Tractor Anudan Yojana Subsidy Maharashtra ट्रॅक्टर स्प्रिंकलर पाईप अनुदान

हलक्या वजनाच्या भरपूर अंडी देणाऱ्या जाती :

कोंबड्यांचा आकाराने लहान चप्पल भित्र्या लवकर अंड्यांवर येणाऱ्या खुडूक न बसणाऱ्या नाजूक असल्यामुळे चांगली घरे असल्याशिवाय थंडीवाऱ्यात टिकाव धरत नाही. इतर जातींपेक्षा कमी खाऊन जास्त अंडी देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ लेगहॉर्न , आंकोना.

भारी वजनाच्या :

मासा करिता उपयुक्त आकाराने मोठ्या शांत थोड्याशा सुचतो. अंड्यावर लवकर न येणाऱ्या असतात. भरपूर खाऊन लवकर चांगल्या गुबगुबीत होणाऱ्या सर्वसाधारणपणे अंडी कमी देत असलेल्या तरी काही पक्षी भरपूर अंडी देणाऱ्या जाती अशी बरोबरी करू शकणार आहेत. प्रमुख जाती ब्रम्हा कोचीन.

मध्य वजनाच्या :

मासाकरिता चांगल्या असून अंडी देण्यासाठी बऱ्यापैकी आहे. हलक्यापेक्षा स्वस्त पण भारी पेक्षा सुटसुटीत उदाहरणार्थ प्लिमथ रॉक, वायन डॉटर्स.

रचना : कुक्कुट पालन कोंबडी पालन अनुदान

डोलदार, चांगली पिसे, अंडी किंवा मास याकरिता विशेष उपयोगी नाहीत. उदा. पोलीश, व्याटमस, सिल्कीज.

जाती व उपजाती :

कोंबड्यांच्या जातीचा विचार करता भूमध्य समुद्रातील आशियातील अमेरिकन युरोपियन असा उल्लेख करणे सोयीचे आहे. मुख्य जाती पासूनच त्या त्या जातीतील चांगल्या गुणांचा अधिकाधिक परिपोष करण्याकरिता खूप जातींची निर्मिती केली असल्याने मुख्य जातींचा उल्लेख या ठिकाणी अभिप्रेत नाही. काही प्रसिद्ध जातींची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया.

भूमध्यसामुद्रिक विभागातील जाते. लेगहॉर्न जास्त अंडी देणारी शास्त्रज्ञांनी त्यातील निवडक घेऊन शास्त्रीय जोपासना करून पैदास केली. इटलीतील लेग हॉर्न तसेच गेम जातीशी संक्रांत आणि ब्राऊन लेगहॉर्न अशा उपजातींचे ही निर्मिती केली आहे. त्यांची कातडी मऊ व तुकतुकीत कोंबड्यांची चोच, कातडी व पाय पिवळे, लाल भडक, सरळ उभा तर मातीच्या एका बाजूस पडलेला साडेपाच ते सहा महिन्यांची मादी अंड्यांवर येऊन बसते.

भारतातील जाती भारतातील खेड्यातून शेकडो वर्षे कोंबड्या पाळल्या जात असल्या तरी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. भारतातील सर्व जाती देशी ह्या एका नावाने जरी माहित झाल्या असल्या तरी त्यातल्या काही जाती पंजाबी, कश्मीरी वगैरे नावांनी प्रसिद्ध आहेत. सुधारित जातीतील माdya साडेचार ते पाच महिन्यात अंडी घालावयास लागतात भारतात अतिशय लोकप्रिय वर्षातून 200 ते 250 पांढरी अंडी देतात.

Read  Shelipalan Anudan Yojana | शेळीपालन अनुदान योजना 2022-23

कुकुट पालन केंद्र :

कुकुट पालन केंद्राची तापमान ऊबदार असावी मात्र फार अधिक तापमान कोंबड्यांना सहन होत नाही. हवा चांगली खेळती ठेवावी पक्ष्यांची विष्ठा नियमितपणे साफ करावी घरट्यात योग्य प्रकाश असावा.

औषधे :

कोंबड्यांना कुक्कुट पालन कोंबडी पालन अनुदान लसीकरण आणि खाद्यातून औषधे देणे आवश्यक असते. यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी किंवा कृषी व पशु वैद्यकीय विज्ञान विभागाचे नेहमी संपर्कात रहावे कोंबड्यांवर ताण येणार नाही. यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते, यासाठी प्रत्येक कोंबडीला योग्य जागा मिळेल गर्दी होणार नाही. पिंजरातील अमोनियाचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागते. गावठी कोंबड्यांच्या पालनासाठी अधिक काळजी करणे आवश्यक आहे. पिल्लांना सुरुवातीचे दिवस जपणे आवश्यक असते. गावठी कोंबडी बॉयलर कोंबडी पेक्षा अधिक भाव देते.

कुकुट पालनासाठी शासनाच्या योजना :

कुकुट पालनासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. नाबाड संस्थे मार्फत कुकुट पालनासाठी कर्ज आणि वेंचर फंड स्वरूपातही मदत केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर शासकीय बँकाच्या कुक्कुट पालनासाठी विशेष कर्जाच्या योजना आहेत. याशिवाय कुक्‍कुट खाद्य निर्मिती केंद्र युनिट उभारणी योजना, कुक्कुट उत्पादन विपणन व्यवस्था केंद्र स्थापित करणे योजना, कुक्कुट उत्पादन निर्यात सहाय्य केंद्र उभारणी योजना आणि कुक्कुट उत्पादनाच्या किरकोळ विक्रीसाठी दुकाने उभारणे योजना या योजना पशुसंवर्धन विभागातर्फे राबविल्या जातात.

कार्यालय :

स्टेट बँक ऑफ इंडिया कार्यालय,
बँक ऑफ इंडिया कार्यालय,
जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय.

कुक्कुट पालन प्रशिक्षण :

कुकूटपालन व्यवसाय करताना प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रशिक्षणामुळे तुम्हाला कोंबड्यांची योग्य निगा राखता येईल. तसेच त्यांना किती प्रमाणात औषध द्यावे व त्यांची काळजी कशी घ्यावी इत्यादी शिकवली जाते. प्रशिक्षण घेण्यासाठी सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आरे कॉलनी गोरेगाव पूर्व 022-29272497.
मिटकॉन इन्स्टिट्यूट शिवाजीनगर पुणे.

  • तुम्हाला जर Essay In Marathi बद्दल अजून जाणून घायचे असेल तर Gyangenix वेबसाईटला नक्की भेट द्या .

“तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.”

योगाटिप्स

3 thoughts on “कुक्कुट पालन कोंबडी पालन व्यवसाय अनुदान कर्ज योजना मार्गदर्शन माहिती 2021

  1. शासनाने कूकूटपालना साठी ज्या योजना आहेत त्यांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी बाकी माहिती सर्वोत्तम…

  2. आनुदान मिळेल का आणि त्याच्या प्रोसेज कशी आहेत याची माहिती पाहिजे
    संपर्क
    9730135255
    9730635255

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x