महा विकास आघाडी सरकारने एकूण 19 नोव्हेंबर रोजी पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केले आहे. धान खरेदी मध्ये सुरू असलेल्या 1800 हमीभावात सरकारने थेट आता सातशे रुपये बोनस जाहीर करीत थेट 2500 रुपये दराने धान खरेदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले
भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर या पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये धानाचे पीक घेतले जात असून यंदा धानाचे चांगले उत्पादन मिळणार अशी अपेक्षा आहे.
यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे रोगराई अतिवृष्टी पूर परिस्थिती अशा अनेक संकटांनी शेतकरी ग्रासला आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली असता त्यांच्या विदारक परिस्थिती लक्षात आली.
केंद्र शासनाकडे राज्य सरकारने पत्र पाठवून अतिवृष्टी पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करावी असे सांगितले होते त्यामुळे केंद्रीय पथक या भागातून पाहणी करून गेले.
मात्र राज्य सरकारने मदत केली परंतु केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळालेली नाही. अशी परिस्थिती बघता विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयाकडे प्रस्ताव मांडून धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने 700 रुपये देण्याचे जाहीर केले.
मागील वर्षी धानाचा हमीभाव 1800 रुपये होता त्यावर राज्य सरकारने 700 रुपये बोनस देण्याचे ठरवले आहे म्हणून आता शेतकर्यांकडून धानाची खरेदी ही 2500 रुपये दराने होणार आहे.
शेतकऱ्यां करता हा मोठा दिलासादायक निर्णय आहे अशाप्रकारे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले