पी एम किसान योजना अंतर्गत दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट दोन हजार रुपये जमा झालेले आहेत आता ही रक्कम शेतकऱ्यांना आपल्या रब्बी पिकासाठी वापरता येणार आहे.
अकोला जिल्ह्यामधील 2 लाख 5 हजार 326 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे लावायच्या स्वरूपा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाची रक्कम जमा झालेली आहे.
त्यामुळे आता शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे कारण त्यांच्या रब्बी हंगामात करता ही रक्कम कामी येणार आहे केंद्र सरकारच्या योजनेनुसार पीएम किसान योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्याचं या योजनेअंतर्गत जाहीर केलेल आहे.
अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे योजना अकोला जिल्ह्यांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम त्वरित आपल्या शेतीउपयोगी वापरता येते केंद्रीय कृषी मंत्रालयाने थेट शेतकऱ्यांना ही रक्कम मिळावी अशी व्यवस्था केलेली आहे, आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात काम सुद्धा तिथे केंद्रीय कृषी मंत्रालय करत आहे.
त्याकरता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करायची आहे. आणि तिथे आपला अर्ज सुद्धा भरायचा आहे.
यामध्ये लक्षात घेण्याजोगी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये कुठलाही दलाल किंवा मध्यस्थी असणार नाही आहे आणि त्यामुळे केंद्राकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याकारणाने शेतकऱ्यांना फार मोठी मदत मिळत आहे शेतकऱ्यांना एक रुपयाही खर्च न करता शेतकऱ्यांना एक रुपयाही खर्च न करता थेट पी एम किसान योजना मध्ये आपले नाव नोंदवता येत आहे.
त्यामुळेच जे शेतकरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते त्यांची या पासून मुक्त झालेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाखांपर्यंत शेतकरी या योजनेचा लाभ सध्या घेत आहेत.