(फ्री लैपटॉप योजना 2023) विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता विद्यार्थ्यांना एका योजनेच्या माध्यमातून लॅपटॉप मिळणार आहे म्हणजेच आता त्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण ग्रहण करता येणार आहे व खूप काही त्यापासून नवनवीन शिकता येणार आहे. सध्याचे युग हे डिजिटल आहे म्हणजेच सध्याच्या जगामध्ये विद्यार्थ्यांना लॅपटॉप वर अनेक प्रकारे काम करता येते शिकता येते , ऑनलाइन लेक्चर पाहता येतात किंवा प्रोजेक्ट बनवण्यासाठी ही आपण त्यावरच सर्च करतो बहुतांश कामासाठी सध्याच्या काळामध्ये लॅपटॉप युज करतात ही योजना खास विद्यार्थ्यांसाठी राबविली गेली आहे. विद्यार्थी मित्रांच कुटुंब जर आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असेल तर ते कुटुंब विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप घेऊ शकत नाही अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होते व ते खूप काही शिकण्यापासून वंचित राहतात याचाच विचार करून सरकारने ही योजना चालू केली आहे. या योजनेमधून विद्यार्थ्यांना एक रुपयेही खर्च न करता लॅपटॉप घेता येणार आहे. या योजनेमधून विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे कारण त्यांना खूप महागडी वस्तू हे सरकारकडून मोफत मिळणार आहे. ज्या विद्यार्थी मित्रांच्या कुटुंबाची परिस्थिती ही कमकुवत असते अशा विद्यार्थी मित्रांसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. साधारण चांगले लॅपटॉप घ्यायचे म्हटल्यावर तीस ते पन्नास हजार रुपये पर्यंत आपणास खर्च येतो, आणि एवढा खर्च सामान्य कुटुंब लॅपटॉप साठी खर्च करू शकत नाही कारण त्यांना घरही चालवा लागते. तर आता या योजनेच्या माध्यमातून शासनाकडून मोफत मध्ये लॅपटॉप मिळणार आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजना ऑनलाइन लिस्ट 2023.
या योजनेमधून तीस हजार रुपये असे विद्यार्थी मित्रांना अनुदान दिले जाणार आहे लॅपटॉप घेण्यासाठी याच अनुदानातून ते स्वतःसाठी स्वतःच्या आवडीचे लॅपटॉप घेऊ शकते . आज-काल पूर्ण शिक्षणा प्रणाली ही लॅपटॉप किंवा मोबाईलवर चालू झालेली आहे व विद्यार्थी मित्रांना शिकण्यासाठी या दोन वस्तूंची खूप गरज आहे तर ही योजना समाज कल्याण विभागाकडून राबविले जात आहे. अगर विद्यार्थी मित्रांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना एक अर्ज भरावा लागेल. ही योजना सध्या चालू आहे पण ही तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे का नाही हे मात्र तुम्हाला माहीत करून घ्यावे लागणार आहे यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये चौकशी करावी लागेल त्यानंतरच आपल्याला माहिती मिळेल. ही योजना सध्या हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे या योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेतून विद्यार्थी मित्रांनो फ्री मध्ये लॅपटॉप साठी अनुदान दिल्या जाईल अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
1) अर्ज करण्यासाठी पात्रता काय ?
विद्यार्थी मित्रांना जर या योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल तर पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणार अत्यंत गरजेचे आहे. या योजनेचा लाभ हे वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी घेऊ शकतात आणि यासाठी एसी, एसटी, ओबीसी अशा प्रवर्गातील विद्यार्थी फ्रॉम भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.