MahaDBT Online अर्ज पुन्हा सुरू

शेतकरी मित्रांनो महाडीबीटी MahaDBT Online पोर्टल वर जर आपण योजनांसाठी अर्ज केला असेल, आणि आपला त्यामध्ये जर नंबर लागला नसेल तर पुन्हा आपण महाडीबीटी पोर्टल वरील योजनांसाठी अर्ज करू शकता. चला तर याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

MahaDBT Online अर्ज सुरू

ज्या शेतकऱ्यांना MahaDBT Portal च्या योजनेत पहिल्या यादी मध्ये लॉटरी लागली नसेल त्यांना आता पुन्हा Online अर्ज करता येणार आहे.

कशाकरिता करता येईल अर्ज

या योजनेमध्ये नांगर, ठिबक, पेरणी यंत्र, विहीर, पावर टिलर, पाईपलाईन, कृषी यांत्रिकीकरण पेरणी यंत्र, रेन पाईप, शेडनेट, शेततळे, ट्रॅक्टर व स्प्रिंकलर अशा विविध स्वरूपाच्या वस्तू न करता महाडीबीटी mahaDBT वर Online अर्ज सुरू आहेत.

Read  Post Office Bharti Maharashtra 2022 | पोस्ट आफिस भरती महाराष्ट्र २०२२ .

योजनांची नावे

आपण महाडीबीटी वरील कृषी उन्नती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, तसेच विहीर योजना अशा 20 पेक्षा जास्त योजना महाडीबीटी पोर्टल वर दिलेले आहेत त्यासाठी आपण तिचे रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.

पहिल्या लॉटरी मध्ये जर आपला नंबर लागला नसेल तर, आपण आता पुन्हा अर्ज करू शकता.

ह्या करता प्रथम आपल्याला महाडीबीटी पोर्टल (mahadbt portal)वर रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर शेतकरी त्यांनाच या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांची क्रमवारी देऊ शकता म्हणजेच पसंती क्रमांक देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला पहिल्या पसंती वर स्प्रिंकलर योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर, त्यासाठी तुम्हाला पसंती क्रमांक एक द्यावा लागेल आणि जर तुम्हाला दुसऱ्या पसंती क्रमांकावर शेततळे ठेवायची असेल तर तेही तुम्ही करू शकता.

Read  शेततळे मत्स्यपालन अनुदान योजना Shettale Matsyapalan Anudan Yojana

महाडीबीटी वरील काही अशा योजना आहेत की ज्या योजनेसाठी आपल्याला 90 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान मिळते. तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा जरूर लाभ घ्या आपल्याला दुसऱ्या वेळेस ही संधी चालून आलेली आहे.

आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर खालील लिंक वर क्लिक करून डायरेक्ट जाता येईल

महाडीबीटी पोर्टल वर जाण्याकरता येथे क्लिक करा

Leave a Comment