मित्रांनो जर आपल्याला शेती अवजारे सिंचन व पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक गोष्टी लागत असतात. त्या योजनांचा लाभ मिळवण्याकरता राज्य सरकार अनुदान देत असते, एवढंच नाही तर आता जनावरांच्या गोठ्या करिता सुद्धा अनुदान दिले जाते आहे.
Maharashtra Government Subsidy For Cattle Herds
शेतकरी मित्रांनो जनावरांना योग्य निवारा मिळावा याकरता निवारा अभावी असणारे गुरेढोरे शेतकऱ्यांना ठेवता यावी व योग्य पशुपालन याकडे त्यांचे लक्ष असावे ह्या करता राज्य सरकारने गोठा अनुदानाची योजना आणली आहे.
जनावरांच्या कोठ्याकरता राज्य सरकारकडून हजारोंची मदत
या योजनेचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शेती करत असताना शेतकरी कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस पालन हे सुद्धा करत असतात आणि शेतीबरोबर अन्य व्यवसाय पासून सुद्धा उत्पन्न मिळावे या उद्देशाने कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस पालन करता अनुदान देण्यात येणार आहे.
म्हणजेच आता सर्व जुन्या आणि नव्या योजना ह्या शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत सहभागी करण्यात आलेले आहेत यामध्ये वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे याकरता अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती बघूया.
शेतकऱ्यांना अनुदान म्हणून मिळतील 77 हजार रुपये
गाय आणि म्हशी अशा दोन ते सहा जनावरांसाठी गोठा बांधायचा असेल तर तुम्हाला जनावरांच्या गोठ्यात करिता 77 हजार 188 रुपये मिळणार आहेत तर 6 किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच बारा जनावरांसाठी दुप्पट तर 18 पेक्षा अधिक जनावरे असतील तर तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.
योजनेचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा?
शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरता इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज करावा लागणार आहे.
अर्जावर अर्ज करत असताना तुम्ही ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी किंवा सरपंच यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात त्याच्या नावासमोर बरोबर अशी खूण करायची आहे.
अर्जावर ग्रामपंचायतीचे नाव तालुका जिल्हा टाकून वर एक फोटो चिकटवून अर्ज द्यायचा आहे.
त्यानंतर अर्जावर अर्जदाराचे नाव पत्ता जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
आता तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज करत आहात त्यावर बरोबरची खूण करावी.
अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी?
मित्रांनो अर्ज करताना कुटुंबाचा प्रकार म्हणजेच एस. सी एस. टी व्ही जे एन टी तसेच महिला प्रधान कुटुंब 2008 च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यांपैकी च्या प्रकारांमध्ये आपले कुटुंब असेल ते लिहावे.
तुम्ही अर्जासोबत जी कागदपत्रे जोडली असतील त्याचा पुरावा द्यावा.
जर तुमच्या नावावर शेतजमीन असेल तर त्याचा सातबारा 8 अ आणि ग्रामपंचायत चा नमुना जोडायचा आहे.
रहिवासी दाखला, शिवाय तुम्ही ज्या साठी अर्ज केला ते काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये येता का हे सुद्धा भरावे.
च्या व्यक्तीने अर्ज केला असेल त्या कुटुंबातील अठरा वर्षाच्या पुढील सदस्यांची संख्या नमूद करायची आहे.
आणि शेवटी घोषणापत्रा वर स्वतःचे नाव लिहून सही किंवा अंगठा द्यायचा आहे.
अर्ज करतांना अर्जासोबत 8 अ, सातबारा उतारा, जॉब कार्ड, मालमत्ता नमुना 8 अ उतारा सोडायचा आहे.
त्यामुळं नंतर ग्रामसभेमध्ये ठराव घ्यायचा आहे.
ग्रामपंचायत मध्ये ठराव झाल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येईल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची सही शिक यानुसार पोचपावती दिल्या जाईल आणि नंतर असं तुम्ही लाभासाठी पात्र आहात किंवा नाही हे सांगितले जाणार आहे.
आणि हो मित्रांनो तुम्ही जर मनरेगा चे लाभार्थी असाल तरी सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल पण जर जॉब कार्ड नसेल तर मात्र लाभ घेता येणार नाही त्यामुळे जॉब कार्ड साठी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकता.