महाराष्ट्र शासन हे महिलांकरिता नेहमी नवनवीन योजना घेऊन येते आताही शासनाकडून एक नवीन योजना आली आहे ती म्हणजे महिला बचत गट कर्ज योजना. आता महिलांना बचत गट यावरून कर्ज मिळू शकणार आहे. या कर्जामधील 12% व्याजाच्या मर्यादेत व्याज हे महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास या महामंडळातर्फे महिलांसाठी व्याज परतावा योजना ही निघाली आहे व खूप महिला याचा लाभ पण घेत आहेत. या योजनेचा हेतू असा एक ग्रामीण भागातील महिलांना खूप सोप्या पद्धतीने पैसा उपलब्ध व्हावा आणि महिलांनी स्वतःची आर्थिक परिस्थिती ही चांगली करण्यासाठी नवीन उद्योग उभारावे. यासाठीच महिला बचत गटाची स्थापना केली जाते जेणेकरून महिलांना आर्थिक मदत व्हावी व त्यांनी स्वतःचे छोटे-मोठे उद्योगधंदे चालू करावे. या योजनेचे नाव आता महिला स्वयंसिद्धी व्यास परतावा योजना असे आहे. ही योजना मागास प्रवर्गातील आणि होतकरू अशा महिलांसाठी आहे या योजनेअंतर्गत बँक कडून पाच ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते.