आता रब्बी हंगामाकरिता 4 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप होणार – दादासाहेब भुसे, कृषी मंत्री

नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रथा प्रसारासाठी कृषी विद्यापीठांमार्फत कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी 3 लाख 14 हजार क्विंटल बियाणे सरकार अनुदानावर वाटप करणार आहे, त्याकरिता 62.79 कोटी लागणार आहेत आणि त्याची तरतूद सरकाने केली आहे असे दादासाहेब भुसे, कृषी मंत्री यांनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की राज्यामध्ये या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी चांगलं पोषक वातावरण आहे. त्यामुळे विविध योजनेअंतर्गत रब्बी ज्वारी करडई मका हरभरा जवस या सर्व पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानीत दराने बियाणे पुरवठा व्हावा यासाठी 3 लाख 13 हजार 586 क्विंटल बियाणे चे नियोजन आम्ही केले आहे.

क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करण्याकरता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्‍वत करण्यासाठी क्लस्टर म्हणजेच समूह पद्धतीने प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. सुधारित अशा तंत्रज्ञानावर आधारित हरभरा 26821 हेक्टर संकरित मका 293 हेक्टर गहू 1830 हेक्टर करडई 1510 हेक्टर रब्बी ज्वारी 2460 हेक्टर आणि जवस 1050 हेक्टर, ऊस पिकामध्ये आंतरिक हरभरा 2500 हेक्टर असे एकूण 36 हजार 464 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Read  प्रधानमंत्री फसल विमा योजना - पीक विमा वाटपासाठी निधी मंजूर आता या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

रब्बी ज्वारी हरभरा मका जवस व करडई या पिकासाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदान दराने बियाणे पुरवठा यासाठी 3 लाख 13 हजार 586 एवढ्या क्विंटल बियाण्याची नियोजन करण्यात आलेले आहे. रब्बी हंगामा करता नवीन विकसित केलेल्या सुधारित संकरित वाणांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी कृभको, राष्ट्रीय बीज निगम महाबीज या संस्थान मार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येणार आहेत.

दहा वर्षाच्या आतील वाणाच्या बियाण्यांकरिता गहू 2000 रुपये क्विंटल मका संकरित 7500 रुपये क्विंटल हरभरा 2500 रु क्विंटल आणि रब्बी ज्वारी 3000 रु क्विंटल या प्रकारे अनुदान मिळणार आहे.

  1. बियाणे व लागवड साहित्य उप अभियान अंतर्गत व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ग्राम बिजोत्पादन या योजनेअंतर्गत हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. म्हणूनच या योजनेमुळे शेतकऱ्यांचे रब्बी उत्पादन वाढण्यास मदतच होईल अशी आशा कृषी मंत्री, दादाजी भुसे यांना वाटत आहे.

Leave a Comment