महाराष्ट्रात हिवाळ्यात पावसाची शक्यता ! बुधवार नंतर येऊ शकतो पाऊस

अरबी समुद्र आणि तामिळनाडू समुद्रामध्ये केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे विदर्भामध्ये बुधवार नंतर हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

अशा प्रकारचे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहे. Western Disturbance मुळे आसपासचे राज्य तसेच तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच विदर्भामध्ये सुद्धा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे बुधवार नंतर कधीही अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे

पूर्व विदर्भला पावसाचा चांगला तडाखा बसू शकतो. बुधवार नंतर पावसाचे वातावरण दोन ते तीन दिवस राहिले कशाही प्रकारे हवामान विभागाने सांगितले आहे. विदर्भामध्ये काही दिवसापूर्वी थंडीचा कडाका होता परंतु त्यानंतर थंडी कमी झाली.

Read  राज्यात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता | Non Seasonal Rain | Weather in Maharashtra

विदर्भातील तापमानात वाढ झाली, या अगोदर विदर्भातील तापमानामध्ये कमालीची घट निर्माण झाली होती. पारा सुद्धा 12.8 अंश आला होता हिमाचल प्रदेश तसेच उत्तर भारतातील बऱ्याच या भागांमध्ये थंडीची लाट निर्माण झाली होती मात्र बंगालचा उपसागर मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या थंडीचा जोर कमी असून जोरदार पाऊस येत नसला तरी तुरळक ठिकाणी कमी पाऊस येण्याची शक्यता आहे सध्या उत्तर भारतामध्ये थंडी कडाक्याची पडत असल्यामुळे विदर्भातही लवकरच थंडीची दाट शक्यता आहे. सध्या तापमान 18 अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. आज चांगलेच तापमान होते.

Leave a Comment