शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी?

शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी? उन्हाळा संपल्यानंतर शेतीच्या कामाला वेग येतो. पावसाळा जवळ येतो, तेव्हा नव्याने शेती करण्याची सुरुवात होते. तर त्याआधी शेतीची मशागत करणे फार गरजेचे असते, ते म्हणजे शेतीची नांगरणी करणे.

शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी?

मित्रांनो नांगरणी का केली जाते? याच विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नांगरणी करण्यासाठी कोणती वेळ महत्त्वाची आहे किंवा शेतीची मशागत का करायची असते? सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची माती भुसभुशीत करावी लागते आणि नंबर दोन म्हणजे मातीच्या खालच्या थरातील कोश मारावी लागतात. नांगरणी केव्हा करायची सकाळ, दुपार की संध्याकाळी हे आपण पाहणार आहोत.

नांगरणी का करतात, नांगरणी करण्याच्या पाठीमागे काही उद्दिष्ट असतात. नेमके कारणं असतात. जमीन भुसभुशीत करणे आणि जमिनी खालची माती पूर्ण वर येईपर्यंत मातीमध्ये अनेक अंडकोष निर्माण झालेल्या असतात आणि ते कोश मारण्यासाठी आपल्याला जमिनीची नांगरणी करावी लागते. हे कोश दुसऱ्या पिकासाठी घातक असतात. म्हणून आपल्याला खालच्या मातीची पलटी करून ती वरती आणावी लागते. त्यामुळे नांगरणी करत असताना केवळ चार ते पाच इंच एवढाच भाग आपण खालचा वर आणि वरचा खाली करत असतो.

Read  PM Kisan Yojana 13 Installment 2022 | पी एम किसान योजना १३ हप्ता २०२२ .

अलीकडे काही शेतकरी नांगर जितका खाली लावता येईल, तितका खाली लावण्याचा प्रयत्न करतात. तर नांगरणीच्या मागचे उद्दिष्ट हेच असते, की जमिनीतील कोश मारले जावेत, नंतर कोश जर मारले नाही तर कोशांचे रूपांतर अंड्यामध्ये होते आणि अंड्यांचे रूपांतर अळ्यामध्ये होते. नंतरच्या पिकासाठी हे आपल्याला धोकादायक असते.

म्हणून पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे कोश मारणं आणि दुसरं मातीची मशागत करणे, ही दोन महत्त्वाची काम आपल्याला नांगरणीच्या माध्यमातून करावी लागतात. म्हणजेच वरची माती खाली टाकून खालची माती वर करण्याचा प्रयत्न करतो. यालाच आपण जमिनीची नांगरणी असे म्हणतो. हे झालं नांगरणी करण्यामागच शास्त्रीय कारण.

त्याच्याही पलीकडे जाऊन विचार केला तर, नांगरनी कधी करायची हा विचार करतो. नांगरणी साठी वेगवेगळे यंत्र उपलब्ध आहेत. ज्या वेळेस त्यांना वेळ मिळेल त्या वेळेस शेतामध्ये येऊन ते नांगरणी करून जातात. परंतु रात्रीला दिवसाला किंवा दुपारी, या वेळेपैकी नांगरणी करण्यासाठीची योग्य वेळ कोणती आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. याच्या मागचे शास्त्रीय कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया.

Read  फुलशेती करून मिळावा लाखोंचे उत्पन्न, Flowers Farming

शेतीची नांगरणी जर रात्री केली असेल तर, जमिनीतील जे खालील कोष वर जमिनीवर येतात ते खाण्यासाठी पक्षी रात्री नसतात. कारण रात्री पक्षी झोपलेले असतात. परंतु ज्यावेळी तुम्ही हेच नांगरणी सकाळी करता तेव्हा हे कोश वरती येतात आणि पक्षी त्या कोषांना खातात.

सकाळी नांगरणी करताना तुम्ही पाहिले असेल की बगळ्यांचे थवे तुमच्या नांगरणीच्या मागे फिरतात आणि हे बगडे मातीतील कोश खाण्यासाठीच असतात. नांगरणी करण्यामागचा हाच उद्देश आहे की, जमिनीतील कोश आहे ते वरती आणणे आणि ते नष्ट करणे.

जर हे कोश मारले गेले नाही, तर त्या कोशांचे रूपांतरण अंड्यामध्ये होते अंड्यांचे रूपांतरण यानंतर अड्यांमध्येच होऊन आपल्या पिकाला धोका निर्माण होत असतो. तर शेताची नांगरणी केव्हा करायची हे आजपासून लक्षात ठेवा. सकाळच्या वेळेला नांगरणी झाली पाहिजे. जेणेकरून जमिनीतील कोश वरती आल्यानंतर ते पक्षांमार्फत नष्ट केल्या जातील. जर हे कोश संपले तर तुमची शेती संपन्न होईल.

Read  जमिनीची सुपीकता कशी वाढवाल? जमिनीची देखभाल कशी कराल?

या गोष्टीवर विचार करा आणि नक्की या पद्धतीला तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरून पहा. पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या बळीराजास पाठवा.

आपण हे वाचले का?

Leave a Comment