सातबारा दुरुस्त कसा करायचा? Satbara Kasa Durust karayacha? सातबारा उतारा 2020-21

नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे सातबारा आहे आणि तो दुरुस्त करायचा असेल तर, आपण कसा करू शकतो याबद्दल आपल्याला माहिती नसेल किंवा असेलही परंतु ह्या लेखांमध्ये मी तुम्हाला आपण आपला सातबारा कसा दुरुस्त करु शकतोत्याबद्दलची माहिती देणार आहे.

मूळ आणि कागदपत्रांचा भक्कम पुरावा असावा

सातबाऱ्यावर आपली माहिती चुकीची असेल म्हणजेच नाव चुकलेला असेल आपली जमीन चुकलेली असेल कुठलीही चुकीची नोंद तुमच्या सातबारावर असेल तर तुम्हाला सातबारा नक्कीच दुरुस्त करून घेता येईल सातबारा दुरूस्त करते वेळी आपल्याला कोण कोणत्या गोष्टी ध्यानात घ्यावे लागतात हे सुद्धा आपण बघणार आहे मित्रानों सातबारा वाचन करत असताना किंवा तो माहिती करून घेत असताना आपल्याला बर्‍याच गोष्टी त्यामध्ये बघाव्या लागतात. त्याकरिता मालकीहक्काचा भक्कम पुरावा आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

चुका कोणत्या असतात?

पण बऱ्याच वेळा आपण बघतो की सातबारा मध्ये अनेक चुका असतात त्या सातबारा मध्ये जर आपण चुका झालेल्या दुर्लक्षित केल्या तर त्या चुका पुढे दुरुस्त होने फार कठीण होऊन बसतं आणि ह्या चुकांमुळे आपले फार मोठे नुकसान सुद्धा होऊ शकतो.  म्हणून सातबारा हा फक्त नाव न पाहता त्यावरील पूर्ण माहिती आपण वेळोवेळी पाहली पाहिजे की त्यामध्ये काही चुका आहेत का? जर चुका असतील तर आपल्या तालुक्यातील तहसिलदाराकडे आपल्याला तसा अर्ज करावा लागतो.

Read  7/12 मध्ये मोठा बदल शेतकऱ्यांना तलाठीं ची गरज नाही

अर्ज कोणाकडे करावा?

त्यासाठी तलाठ्याकडे आपण अर्ज करू शकत नाही कारण तहसीलदार हा या प्रकरणाची चौकशी करतो.  तरच तलाठ्याला त्यामध्ये दुरुस्त करण्याचे आदेश सुद्धा देऊ शकतो.  म्हणजेच नावांमध्ये दुरुस्ती असेल चुकीची नोंद झालेली असेल किंवा अन्य कुठलीही गोष्ट त्यामध्ये चुकीची घडलेली असेल लिहिल्या गेलेली असेल तर तसा अर्ज आपल्याला तहसिलदाराकडे करावा लागेल आणि नंतरच मग तुमचा सातबारा दुरुस्त करण्याचे आदेश तहसीलदार तुमच्या तलाठ्याला देऊ शकतात.

कोणती कृती केली जाते?

यासंबंधी प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवली जाते. ज्या चुका आहेत त्या व्यक्तीला कबूल असणे गरजेचे आहे आणि अर्ज केल्यानंतर तहसीलदार त्या व्यक्तींना समन्स सुद्धा बजावत असतात.  संबंधित व्यक्तीने कुठलीही तक्रार किंवा कशाप्रकारे आक्षेप घेतला नाही तर विनंती अर्ज तुमचा मान्य होतो.  तुमच्या नावामध्ये दुरुस्ती  केल्या जाते किंवा ते नाव कमी केले जाते.

Read  Ativrushti Nuksan Bharpai Nidhi | अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मंजूर

कधी चुका दुरुस्त होतात?

आता आपण बघू की अशा कोणत्या चुका  होतात आणि ते आपण दुरुस्त कसे करू शकतो.  मित्रांनो सातबारा पुन्हा बनवत असताना जर एखाद्या व्यक्तीचे नाव लिहायचे राहून गेले,  तुम्हाला कायद्याअंतर्गत चूक दुरुस्त करता येते.  जर पूर्वीच्या सातबारामध्ये ते नाव असेल किंवा तो उल्लेख असेल तरच पुन्हा नवीन सातबारा मध्ये ती चूक दुरुस्त करता येते.

कोणत्या कलम अंतर्गत दुरुस्त होते?

समजा तुम्ही बऱ्याच दिवसांपूर्वी तहसिलदाराकडे सातबारा मधील एखादे नाव कमी करण्यासाठी अर्ज केला असेल आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे आदेशही दिले असतील. पण जर त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसेल तर तुमची चूक नंतर कलम 155  अंतर्गत दुरुस्त सुद्धा होऊ शकते आणि समजा तुम्ही एखादी जमीन खरेदी केली आहे आणि त्या सातबारामध्ये आधीच्या मालकाचे नाव पाहिले असेल,  तर कलम 32 ग नुसार तुम्हाला नावामध्ये बदल करता येतो पण तुम्ही जमिनीची पूर्ण रक्कम तेथे भरलेली असणे गरजेचे आहे.

Read  Ration New Rules 2023 | राशन नवीन नियम २०२३

आपण जेव्हा एखाद्या जमिनीचा खरेदीचा व्यवहार पूर्ण करतो त्यावेळेस त्याची रजिस्टर कॉपी आपल्याकडे असते आणि त्यातील महत्त्वाचा मजकूर अर्जदाराचे नाव किंवा जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे यामध्ये काही चुका झाल्यास ती कलम 155 अंतर्गत दुरुस्त करता येते.  जर एखाद्या वारसाचे नाव सातबारामध्ये सादरी नोंदवण्यात आले नसेल तर तेसुद्धा या कायद्यानुसार आपल्याला सातबारा मध्ये समाविष्ट करता येते.

 

कुठेतरी मूळ कागदपत्रांमध्ये केलेला उल्लेख किंवा आदेश नोंदविण्यात चूक झाली असेल,  तर सर्वांचे म्हणणे लक्षात घेऊन अशी चूक आपल्याला दुरुस्त करता येऊ शकते.  अशाप्रकारे आपण आपल्या सातबारा मध्ये आपले नाव किंवा क्षेत्रफळ  किंवा वारस त्यामध्ये आपण बदल निश्चितच करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला सातबारा दुरुस्ती करता येते.

Leave a Comment