group

1 कोटी 50 लाख सातबारा उतारे झाले संगणकीकृत, बघा नवीन सातबारा कसा दिसेल

सुमारे पन्नास वर्षां नंतर सातबारा मध्ये बदल करण्याचे काम सुरू झाले आहे आतापर्यंत 1 कोटी 50 लाख सातबारा मध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे इ महाभुलेख असलेला वॉटरमार्क आणि शासनाचा लोगो असलेला सातबारा यावर गावाच्या नावाचा कोड असणार आहे.

राज्यात किती उतारे आहेत?

बिन शेतीसाठी वेगळा सातबारा आणि शेतीसाठी वेगळा सातबारा असणार आहे. राज्यामध्ये सध्या 2 कोटी 53 लाख सातबारा उतारे आहेत. सातबारा हा जमिनीशी संबंधित असलेला महत्त्वाचा पुरावा आहे कॉम्प्युटर युक्त सातबाराच्या नमुन्यामध्ये बदल करण्यास महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यामध्ये मंजुरी दिलेली आहे.

जुन्या सातबारामुळे काय घडत असे?

त्यामुळेच आता शेतकरी वर्गाला नवीन स्वरुपात सातबारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक गैरप्रकार घडतात जुना सातबारा दाखवून जमीन लाटण्याचा प्रकार आपल्या अवतीभवती घडतो. त्या जमिनीची खरेदी-विक्री सुद्धा करण्यात येते. शासकीय भाषेमध्ये सातबारा उतारा असल्या कारणाने सर्वसामान्य लोकांना तो सातबारा समजत नाही.

Read  PM Pik Vima Yojana 2022 | प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२.

त्यामुळे असे फसवेगिरीचे प्रकार घडत असतात. म्हणूनच शासनाने अशा फेस फसवेगिरी लाल लगाम लावण्यासाठी आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना सातबारा प्रति दिलासा देण्यासाठी सातबारा संगणीकृत करण्यास सुरुवात केलेली आहे.

महसूल विभागाकडून संगणीकृत सातबारा मध्ये बदल करण्यास आता सुरुवात झाली आहे. सात म्हणजे काय तर जमिनीची मालकी म्हणजेच भोगवटादार असलेल्यांची नावे आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेले क्षेत्र, तर बारा म्हणजे पीक पाण्याची नोंद असणे. आणि त्यालाच आपण सातबारा उतारा असे म्हणतो आता हा सातबारा समजण्यासाठी खूप सोपा असणार आहे आणि त्यामधील नोंदी सुद्धा आपल्याला लगेच कळतील.

आता बघू आपण की नवीन सातबारा कसा असणार आहे

नवीन सातबारा कसा असणार आहे?

सातबारा उतारा च्या मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो असणार आहे आणि ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगो चा वाटर मार्ग तिथे असणार आहे.

Read  Ativrusti and Purnuksan Anudan Yojana Yadi 2022 | अतिवृस्टी व पूरनुकसान अनुदान योजना यादी २०२२ .

लागवडी योग्य क्षेत्र पोट खराब क्षेत्र यासोबतच एकूण क्षेत्र म्हणजेच अ+ब सातबारा मध्ये स्वतंत्र दर्शवलेले आहेत.

गावाच्या नावासोबत एल जी डी कोड असेल.

आता खातेदार अथवा खातेदाराच्या नावाच्या सोबतच खाते क्रमांक राहणार आहे यापूर्वी तो खातेदाराच्या हक्काच्या रकान्यात किंवा कंसामध्ये असायचा शेती क्षेत्रासाठी हे आर चौरस मीटर आणि बिनशेती क्षेत्राकरीता आर चौरस मीटर हे एकक राहणार आहे.

बिन शेती क्षेत्राच्या नमुन्यावर 12 छापला जाणार नाही तो फक्त नमुना सातच असणार आहे

संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार अथवा मयत खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शवल्या जात होत्या, आता कमी केलेली नावे व कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शवण्यात येत आहे.

Read  जमीन खरेदी विक्री नियम

क्षेत्र अकृषीक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याकारणाने या क्षेत्रासाठी गाव नमुना 12 याची आवश्यकता नाही अशी सूचना देखील त्यावर छापण्यात येणार आहे.

Originally posted 2022-03-16 09:29:23.

group

Leave a Comment

x