जमीन विक्रीतील बनवेगिरी थांबणार | दुय्यम निबंधकांना मिळाल्या सूचना

बर्याच वेळा आपल्याला जमीन घोटाळा होत असताना दिसतो नामानि वतन असा शेरा असलेल्या बनावट सातबारा देऊन होणारी हस्त नोंदणी कुणाच्या परवानगीशिवाय होणारी खरेदी-विक्री सर्वच गैरप्रकारांना आता लगाम लागणार आहे. काही दुय्यम निबंधकांकडून दस्त नोंदविले जातात. खऱ्या जमीनमालकांना नाहक याचा त्रास होत असतो. Yaaमुळे अशा जमीन मालकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागतो.

जमीन विक्रीतील बनवेगिरी थांबणार

भूमी अभिलेख कार्यालयाने या विरोधात पावले उचलली दिसतात अशाप्रकारच्या कार्यवाहीला मार्गाने खरेदी-विक्री करणाऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे.

शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार दुय्यम निबंधकांनी आता नोंदणी करताना संगणीकृत सातबार्यावर वॉटरमार्क आहे का? याची तपासणी करावी. शेतीसाठी किंवा हस्तलिखित असणारे सातबारे ग्राह्य धरण्यात येऊ नये.

असेच भोगवटदार वर्ग 2 जमीन असल्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी आहे का? याची खातरजमा करावी लागणार आहे. अशा सूचना आता भूमी अभिलेख कार्यालयाने दुय्यम निबंधक कार्यालयास दिल्या आहेत. यात मागील तीन चार वर्षापासून नोंदणी व मुद्रांक विभागाची ई फेरफार प्रणाली आय सरिता प्रणाली एकमेकांशी लिंक आहे.

Read  solar Panal Yojana Maharashtra 2023 | सोलर पैनल योजना महाराष्ट्र २०२३ .

7/12 उतारा दस्त करून देणार्‍यांची नावे असल्याशिवाय नोंदणी करता येत नाही. सध्या भाडेकरार, अदलाबदल पत्र, गहाण खत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र, हक्कसोडपत्र व खरेदी सात प्रकार ऑनलाईन नोंदणी करता येतात.

सात दस्त प्रकारांसाठी दुय्यम निबंधक यांना ‘स्कीप’ पर्याय वापरता येणार नाही. परिस्थिती अत्यंत अपवादात्मक असली नमूद करून स्किप पर्यायाला वापरण्यास परवानगीचे अधिकार मुद्रांक जिल्हाधिकारी यांना आहेत याची प्रक्रिया सुरळीत अचूक होण्याची जबाबदारी सात ऑनलाईन दस्त नोंदणी व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी महसूल विभाग आणि नोंदणी विभागाची आहे.

साता दस्त नोंदणी करताना दुय्यम निबंधक गाने खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे अशा सूचना शासनाने जारी केलेले आहेत

दुय्यम निबंधकासाठी सूचना:

1. शेतजमिनीच्या सातबारावरील एक हेक्टर आर चौरस मीटर असेल तर दस्तनोंदणी देखील हेक्टर आर चौरस मीटर मध्ये करावी

Read  joinindianarmy nic in | इंडियन आर्मी भरती

2. जमीन मालकी हक्काचे हस्तांतरणाबाबत होणारे दस्त शक्यतोवर ऑनलाईन नोंदवावेत.

3. सातबार्यावर नमूद स.नं पोट हिस्यांप्रमाणे स.नं व पोट हिस्सा नंबर दस्ता मध्ये नमूद करून दस्त नोंदणी होत आहे ना याची खात्री करून घ्यावी.

4. दस्त नोंदणी करताना जमीन प्रतिबंधित सत्ता प्रकाराची असल्याचा उल्लेख असल्यास गरजेप्रमाणे परवानगी आदेशाची प्रत तहसीलदारांना दाखवून सातबारा दस्त नोंदणीसाठी तात्पुरता खुला करण्यात यावा

Leave a Comment