joinindianarmy nic in | इंडियन आर्मी भरती

joinindianarmy nic in भारतीय सैन्यात अधिकारी पदांसाठी भरती, महिलांनीही अर्ज करावा, माहिती जाणून घ्या.

भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर… ज्यांना भारतीय सैन्य दलात भरती होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.  भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत तांत्रिक अधिकारी (पुरुषांसाठी 59 वा अभ्यासक्रम आणि महिला उमेदवारांसाठी 30 वा अभ्यासक्रम) ची अधिसूचना जारी केली आहे. इंडियन आर्मी एसएससी कोर्स ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होईल.  पात्र आणि इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवार  joinindianarmy.nic.in  या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. 8 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

अर्ज करण्यास पात्र उमेदवार :

अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केल्यानंतर उमेदवार पात्रता संबंधित माहिती तपासू शकतात.

Read  Talathi Bharti Timetable 2023 | तलाठीभरती वेळापत्रक २०२३ .

वय :

उमेदवाराचे वय 20 ते 27 वर्षे दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत असेल.

निवडप्रक्रिया :

उमेदवाराची निवड ही शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मुलाखतीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केलेल्या उमेदवारांना जॉईनिंग लेटरसाठी बोलावले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच उमेदवारांना अधिकारी म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाईल.

कसा करणार अर्ज ?

सर्वप्रथम joinindianarmy.nic.in या भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मुख्यपृष्ठावरील अधिकारी निवड विभागात दिलेल्या अधिकारी प्रवेश अर्ज/लॉग इन वर क्लिक करा.

उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल.

त्यानंतर उमेदवार लॉग इन करून सुद्धा अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्ही त्याची प्रिंटआउट मिळवू शकता.

ही माहिती ही माहिती इतरांनाही शेअर करा व तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment