PM Kisan Yojana योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळली; तुमचे नाव आहे किंवा नाही कसे तपासाल?

पंतप्रधान किसान सन्मान योजने PM Kisan Yojana मार्फत देशातील शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत ७ हप्त्यांमध्ये १४ हजार रुपये मिळाले आहे. आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ मे रोजी आठव्या हप्त्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठव्या हप्त्याची रक्कम खात्यात २ हजार प्रमाणे जमा केली जाणार आहे.  PM किसान योजनाच्या लाभार्थ्यांच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आलीय.

पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत पाहता आतापर्यंत ११.६६ कोटी शेतकऱ्यांना १.१५ लाख कोटी रुपये दिले गेले आहेत. तर या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा PM किसान सन्मान योजनेचा लाभ घेतला होता. यात ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे अशा व्यक्तींकडून अपात्र असूनही घेतलेली  ती रक्कम वसूल करण्याचं काम सुरु आहे. मागील काही दिवसांपासून अपात्र शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये परत घेण्यात आले आहेत. आता केंद्राच्या कृषी विभागाने अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याबरोबर त्यांची नाव हटवण्यास प्रारंभ केला आहे.

Read  PM Kisan Yojana New Rules 2022 | पी एम किसान योजना नवीन नियम २०२२ .

आपले नांव यादीत कसे तपासाल

1 पहिल्यांदा  pmkisan.gov.in या वेबसाईटवर भेट द्या.

2 आता तुम्ही pm kisan योजनेच्या होम पेज ला जाल.

3  किसान किंवा फार्मर कॉर्नवर जा.

4 जर एखाद्या व्यक्तीने याआधी अर्ज केला असेल परंतु  आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार क्रमांक चुकीचा असल्याची माहिती मिळणार तुम्हाला दिसेल.

5 फार्मर कॉर्नरवर जाऊन किसान सन्मान निधी PM Kisan nidhi योजनेसाठी नोंदणी करू शकता.

6 या पोर्टल वर सरकारने शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. याठिकाणी आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती माहिती करून धेण्याकारीता  शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक, बँक अकाउंट नंबर, मोबाईल नंबर याचा वापर करता येणार आहे.

7 ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन बघू शकणार आहात.

Read  PM Kisan Yojana 12th List 2022 | पी एम किसान योजना १२ यादी २०२२ .

काय आहे पी एम किसान योजना?

पी एम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ७ व्या हप्त्याची रक्कम २५ डिसेंबर २०२० पासून मिळण्यास प्रारंभ झालं आहे. दर वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण ३ हप्त्यात ६ हजार रुपये जमा केले जातात.,आजपर्यंत ९ कोटी ४१ लाख शेतकऱ्यांना ७ वा हप्ता मिळाला आहे. तर या योजनेमध्ये पहिला हप्ता हा १ डिसेंबर ३१ ते मार्च या काळात दिला जातो. आणि दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचा लाभ १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत जमा केला जात असतो.

Leave a Comment